कोल्हापूर म्हटलं की, झणझणीत जेवण. त्यात अख्खा मसुर म्हटलं तर व्वा! (Kolhapuri Akkha Masoor) क्या बात है… एकदा खाल्लं की जीभेवर चव रेगाळणारच. कोल्हापूरसोबतच कराड, सातारा, सांगली या भागात अख्खा मसूरसाठी स्पेशल हॉटेल्स आहेत. पण, ढाब्यावरची चवच न्यारी! (Kolhapuri Akkha Masoor)
तर मग चला बनवूया अक्खा मसूरची झणझणीत रेसिपी. बनवायला सहज आणि कमी वेळेत होणारी. तसेच पार खर्चिक नसणारी ही रेसिपी आहे. एखाद्या सुट्टीच्या दिवशी अख्खा मसूर पुरीचा बेत बनवायला हरकत नाही. अख्खा मसूर पोळी, भाकरी, रोटी, पुरी, भातासोबत खाऊ शकता. तिखट कमी हवे असेल मिरच्या कमी घालाव्यात.
[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="लंच" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="५" prepration_time="२०" cooking_time="२०" calories="" image="" ingradient_name-0="मसूर" ingradient_name-1="तेल" ingradient_name-2="जिरे" ingradient_name-3="कांदा" ingradient_name-4="लसुण" ingradient_name-5="कडीपत्ता" ingradient_name-6="हिरव्या मिरच्या" ingradient_name-7="कोथिंबीर" ingradient_name-8="आले" ingradient_name-9="पाणी" ingradient_name-10="टोमॅटो" ingradient_name-11="हळद" ingradient_name-12="मीठ" ingradient_name-13="साखर" ingradient_name-14="तमाल पत्री" ingradient_name-15="गरम मसाला" ingradient_name-16="तिखट" ingradient_name-17="छोले मसाला" ingradient_name-18="पाणी" direction_name-0="एका भांड्यात मसुरा रात्रभर भिजवून घ्या." direction_name-1="दुसरीकडे मिक्सरमध्ये कोथिंबीर, लसुण, आले, हिरव्या मिरच्या पेस्ट करून घ्या" direction_name-2="एक कढई घेऊन गॅसवर तापवायला ठेवा" direction_name-3="त्यामध्ये चार चमचे तेल टाका" direction_name-4="तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरे टाका" direction_name-5="एक बारीक चिरलेला कांदा तेलात टाका" direction_name-6="कांदा चांगला लाल होऊपर्यंत भाजून घ्या" direction_name-7="तेलात एक तमालपत्रीचे पान टाका" direction_name-8="वरून कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि आले पेस्ट टाका," direction_name-9="एक टोमॅटो बारीक चिरून टाका" direction_name-10="हे मिश्रण चांगले भाजून घ्या" direction_name-11="आता भिजवेलेले मसुर टाकून चांगले मिक्स करून घ्या" direction_name-12="वरून हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला, छोले मसाला टाका" direction_name-13="सर्व मिश्रण एकजीव करून घ्या" direction_name-14="वरून पाणी घाला" direction_name-15="मसुर शिजत आले की, बारिक चिरलेली कोथिंबीर टाकून सजवून घ्या." notes_name-0="" html="true"]