पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येक घरात फ्रिजचा वापर अधिक होतो. दरम्यान या फ्रिजमध्ये केवळ पालेभाज्याच न ठेवता अनेक शीतपेये, सॉस, दही, दूध, जेवण, कोल्ड्रिंक्स, मसाले, पाणी, ज्यूस, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ ठेवले जातात. घरात जर लहान मुले असल्यास ती फ्रिजमध्ये सारखे- सारखे खाण्याचे पदार्थ शोधताना दिसतात. आपल्या कामाच्या घाईगडबडीत चूकून फ्रिजमध्ये काहीतरी पदार्थ उघडा राहिला असेल किंवा ज्यूस वगैरे सांडले असेल तर आपल्याला लक्षात राहत नाही वा गडबडीत दुर्लक्ष होतं. मग फ्रिजमध्ये डाग तर पडतातच पण वासही येतो. मग अशावेळी खालील टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा फ्रिज स्वच्छ ठेवू शकता. ज्यामुळे येणारा वास, दुर्गंधी नाहीशी होऊ शकते. ( Fridge cleaning )
१. फ्रिज स्वच्छ करण्यासाठी पहिल्यांदा स्वीच बंद करून त्यातील विद्युत प्रवाह बंद करावा.
२. यानंतर फ्रिज स्वच्छ करण्यासाठी खाण्याचा सोडा, व्हिनेगर, लिंबू, पाणी आणि कोणतेही हँडवॉश किंवा घरातील भांड्यासाठी वापरण्यात येणारे डिशवॉश यांचा वापर करून एक लिक्विड बनवावे. (टिप- लिक्विड बनवताना किमान चार ते पाच वाटी पाणी घ्यावे.)
३. फ्रिज साफ करण्यासाठी एका सुती कापडाचा वापर करावा. (टिप- भांडी घासण्याचा स्क्रबर किंवा तारेच्या वस्तुचा वापर करून नये.)
४. यानंतर फ्रिजमधील एक- एक करून सगळे साहित्य बाहेर काढावे. (भाज्या कमी असताना फ्रिज स्वच्छ करायला घेतल्यास फ्रिज रिकामा करण्यास वेळ लागत नाही.)
५. यानंतर फ्रिजमध्ये सांडलेले मसाले किंवा कोरडा कचरा ब्रश किंवा वाळलेल्या कापड्याने पहिल्यांदा पुसून घ्यावा.
६. यानंतर फ्रिजमधील अलगद एक- एक कप्पे काढून तयार केलेल्या लिक्विडमध्ये कापड भिजवून पुसून घ्यावे. यानंतर पाण्याच्या नळाखाली स्वच्छ धुवून हे साहित्य दिड तास उन्हात वाळवण्यास ठेवावे.
७. रिकाम्या फ्रिजमध्येही लिक्विडच्या कपड्याने आणि हलक्या हातांनी पुसून घ्यावे. यावेळी चिकटलेले डाग, सांडलेले पदार्थ (दही, दुध, कोल्ड्रिंग्स, सॉस, जेवण) यासारखे पदार्थांचे डाग स्वच्छ करावेत.
८. यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यात कापड भिजवून फ्रिज आतून- बाहेरून दोन्ही बाजूने पुसून घ्यावा.
९. यानंतर फ्रिजच्या वरच्या बाजूस असणाऱ्या रबरी पट्याच्यातील घाण बोटांनी पुसून काढावी.
१०. दरम्यान फ्रिजच्या आजूबाजूला आणि आतमध्ये कानाकोपरा साफ करावा.
११. सर्व बाजूंनी फ्रिज स्वच्छ झाल्यावर अर्धा तास सुकत ठेवावे.
१२. यानंतर शेवटी फ्रिजमधील काढलेले सर्व साहित्य किंवा कप्पे जागच्याजागी ठेवावेत.
१३. तीन-चार महिन्यातून फ्रिज स्वच्छ केल्यास त्यातील दुर्गधी तर दूर होईलच. यासोबत तुम्हचा फ्रिज नेहमीपेक्षा नीटनेटका आणि चकाचक दिसेल. ( Fridge cleaning )
हेही वाचा :