पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य अमेरिकन देश होंडूरासरमध्ये महिलांसाठी असलेल्या तुरुंगात गॅंगवॉर झाले. यात ४१ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सरकारी वकील कार्यालयाचे प्रवक्ते युरी मोरा यांच्या म्हणण्यानुसार, यातील बहुतांश जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर काहींना गोळ्या लागल्या आहेत. या घटनेने होंडुरासची राजधानी टेगुसिगाल्पा हादरुन गेली आहे. (Honduras prison violence)
अधिक माहितीनुसार, होंडुरासमधील महिला तुरुंगात मंगळवारी (दि.२०) झालेल्या भीषण गॅंगवॉरमध्ये सुमारे ४१ महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश महिला कैद्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. होंडुरासच्या राष्ट्रीय पोलिस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी सांगितले की, होंडुरासची राजधानी टेगुसिगाल्पापासून ३० मैल (५० किलोमीटर) वायव्येस असलेल्या तामारा येथील तुरुंगात २६ जणांना जाळून मारण्यात आले आणि उरलेल्यांना गोळ्या घालण्यात आल्या. टेगुसिगाल्पा रुग्णालयात किमान सात कैद्यांवर उपचार सुरू आहेत.
मोरा यांच्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने जेवढे मृतदेह काढले आहेत. त्यांची संख्या ४१ आहेत. सरकारने कारागृहातील दाखवलेल्या व्हिडिओमध्ये अनेक पिस्तुले आणि चाकूचा ढीग आणि इतर धारदार शस्त्रे दिसून येत आहेत. होंडूरासचे अध्यक्ष झिओमारा कॅस्ट्रो म्हणाले की, "हा हिंसाचार पूर्वनियोजित होता." त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, या प्रकरणी संबंधी मी कठोर कारवाई करणार आहे!"
तुरुंगाबाहेर कैद्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. "आम्ही येथे दुःखाने, वेदनांनी मरत आहोत. आमच्याकडे या हिंसाचारप्रकरणी कोणतीही माहिती नाही. अझुसेना मार्टिनेझ या महिलेची मुलगी या तुरुंगात होती, त्या म्हणाल्या की, "आधीच ४१ मृत आहेत. आमचे नातेवाईकदेखील त्यात आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही.
हेही वाचा