त्वचेला उजाळा देणारे, त्वचेचा तेलकटपणा कमी करणारे, त्वचेवरील डाग, काळेपणा कमी करण्यास उपयोगी ठरणारे आणि त्वचेचा कस वाढविणारे असे अनेक पॅक किंवा लेप फार वेळ वाया न घालविता घरच्या घरी तयार करता येतात. असे लेप चेहर्यावर लावल्याने, लेप आणि त्वचा यांच्यादरम्यान निर्वात पोकळीने त्वचेचा बाहेरील भाग थोडा खेचला जातो. त्यामुळे त्वचेलगतचे रक्ताभिसरण वेगाने होऊ लागते आणि त्वचेला पोषक द्रव्यांचा अन्नपुरवठा होऊन त्वचा टवटवीत आणि ताजी दिसू लागते. (Home Made Facepack )
Home Made Facepack : असे बनवा घरच्या घरी नैसर्गिकरित्या फेसपॅक
- सौंदर्यसाधनासाठी मध हा बहुगुणी आहे. 1 चमचा मध आणि 1 चमचा दुधावरील साय या मिश्रणाने त्वचेवरील कोरडेपणा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सुरकुत्या नाहीशा होतात. एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे मध हे मिश्रण तर निस्तेज त्वचेत बदल घडवून आणते. मक्याच्या दुधात 'अ' व 'ड' ही जीवनसत्त्वे असतात. त्याचाही पॅक म्हणून उपयोग होतो. (Home Made Facepack )
- सौंदर्यवतींची सर्वांत आवडती वस्तू म्हणजे बदाम, खसखस. यांच्या वाटलेल्या मिश्रणात भरपूर तेल आणि प्रथिने असतात. दुधात या पावडरींचे समप्रमाणात मिश्रण बनवून लेप लावावा. सर्व वयांतील स्त्रियांसाठी जीवनसत्त्वदायक असा हा पॅक आहे. चेहर्यासाठी मक्याचे पीठ, मेथ्यांचे पीठ, ओटचे पीठ यांचाही वापर करता येतो. या पिठात अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा लिंबे, संत्री, मोसंबी यांच्या साली वाळवून त्यांची भुकटी करून, यांची पेस्ट होईल इतके पाणी घालून पॅक तयार करावा. (Home Made Facepack )
- डोळे आणि ओठ सोडून चेहरा, मान या भागावर लावून 10 ते 15 मिनिटांनी काढावा. यातून 'क' जीवनसत्त्व मिळते. त्वचा तजेलदार दिसण्यासाठी 'अ', 'ड', 'क' ही जीवनसत्त्वे महत्त्वाची आहेत. आंबेहळद, जायफळ दुधात किंवा लिंबाच्या रसात उगाळून हा लेप करावा. हा लेप रक्तशुद्धी करणारा आहे. त्वचेवरील काळसरपणा किंवा डाग घालवण्यासाठीही फायदेशीर ठरतो.
हेही वाचा:
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.