file photo 
Latest

मुंबई हायकोर्ट स्‍वीय सहायक पदाचा पेपर सोशल मीडियावर फुटला; ॲडमिनविरूद्ध गुन्हा

निलेश पोतदार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायलयाच्या वैयक्तिक सहायक पदाच्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील सेंटरवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी टेलिग्रॅम आणि व्हॉट्सअॅप चॅनलच्या ॲडमिन विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या एका उच्च पदस्थ अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबई उच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांच्या स्वीय सहायकाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात श्रुत लेखन चाचणीच्या संदर्भात 4 फेब्रुवारी रोजी प्रदेशनिहाय परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मुंबई येथील प्रिन्सिपल सीटच्या निर्देशानुसार, या कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर येथे लघुलेखन चाचणी नऊ बॅचमध्ये (परिशिष्ट "ब") आयोजित केली होती. ज्यासाठी 830 उमेदवार उपस्थित होते. चौथ्या तुकडीची चाचणी संपण्याच्या मार्गावर होती, दुपारी 1.25 च्या सुमारास या परिक्षेत एका उमेदवाराने डिप्टी रजिस्टारसह परीक्षा घेणाऱ्या पर्यवेक्षक यांना सदर परीक्षेत सोशल मीडियावर श्रुतलेखन परीक्षेतील मजकूर हा एका उमेदवाराच्या मोबाइलवर पाहिल्याची माहिती दिली.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल

या माहितीवरून प्राथमिक चौकशी करण्यात आली. हा पेपर फुटीचा प्रकार समोर आला. या प्रकरणी कोर्टाचे रजिस्ट्रार (प्रशासन) सुधीर श्रीनिवास कानडे यांच्या तक्रारीवरून टेलिग्राम चॅनल अॅडमिन अशफाक याच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
पोस्ट डाऊनलोड झाली नाही.

या घटनेची माहिती कोर्टाच्या ग्रुपवर देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठातील दोन्ही निबंधकांनी (प्रशासन) टेलिग्राम पोस्ट डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती पोस्ट टेलिग्राम वापर कर्त्यांनी nn हटवल्याचे निदर्शनास आले. या दरम्यान काही स्क्रीन शॉट सुरक्षित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT