पुणे : गेल्या चोवीस तासांत कोकणसह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली, तर राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. कोकण वगळता उर्वरित राज्यात 11 सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी होत आहे. कोकणात 15 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत या चारही राज्यांत जोरदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात कोकणात सर्वाधिक पाऊस दापोली येथे 250 मि.मी. इतका झाला आहे.
24 तासांत झालेला पाऊस : कोकण : दापोली 250, रत्नागिरी 190, वाकवली 170, गुहागर 170, माणगाव 160, चिपळूण 160, हरणई 150, रोहा 150, तळा 130, वैभववाडी 110, लांजा 100, जव्हार 100, म्हसळा 100, पोलादपूर 90, महाड 90, संगमेश्वर, देवरूख 90, भिवंडी 90, माथेरान 90, मोखेडा 90, श्रीवर्धन 90, मुरूड 80, मंडणगड 80, अंबरनाथ 80, खालापूर 80, सांताक्रूझ 80, मुरबाड 70, उल्हासनगर 70, रामेश्वर 70, कर्जत 70, राजापूर 70; मध्य महाराष्ट्र : त्र्यंबकेश्वर 150, हर्सूल 150, ओझरखेडा 13, जामनेर 110, लोणावळा 110, महाबळेश्वर 110, पेठ 100, इगतपुरी 90, दिंडोरी 80, सुरगणा 80, यावल 70, आंबेगाव 70, गगनबावडा 70, सिन्नर 70, नाशिक 70, दहिगाव 70; मराठवाडा : सोयगाव 130, भोकरदन 25, पूर्णा 23, कळमनुरी 22, जालना 22, तोंडापूर 21; विदर्भ : मलकापूर 75, वर्धा 51, नांदरा 50, रामटेक 50, बुलडाणा 46, खामगाव 43, आर्वी 42, जळगाव, जामोद 42, पवनी 39, मोताळा 38, रिसोड 38, आष्टी 37, लोणार 35, चिखली 34, मेहकर 33, शेगाव 33; घाटमाथा : कोयना (पोफळी) 146, ताम्हिणी 130, अंबोणे 129, लोणावळा 109, दावडी 114, शिरगाव 112, लोणावळा (टाटा) 110, खोपोली 90.
हेही वाचा