नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडा या भागात सोमवारी (दि.30) मुसळधार पाऊस झाला. तर दिल्लीतील मूसळधार पावसामूळे अनेक रस्ते जलमय झाले. तसेच काही भागात वादळी वा-यसह गारपीट झाली.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसळधार पावसामूळे अनेक प्रवासी विमानांचे उड्डाणे रदृ करण्यात आली आहेत. ही प्रवासी विमाने हवामान पूर्ववत होण्याची वाट पाहत आहेत, ज्यामुळे उड्डाणांना विलंब होऊ शकतो.
याबाबत इंडिगोने ट्विट केले आहे की, पाऊस आणि वादळामुळे विमाने उड्डाणावर मोठा परिणाम होवू शकतो. तसेच दुर्घटना टाळण्यासाठी उड्डाण हाेण्यास वेळ द्यावा लागेल. तर त्यांनी प्रवाशांसाठी विमानांची स्थिती तपासण्यासह मदतीसाठी Twitter/Facebook वर डीएम करा,असे आवाहन केले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीच्या काही भागात सुरुवातीला हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच रविवारी संध्याकाळी ही पाऊस झाला, ज्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला होता. कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. जे हंगामाच्या सरासरीपेक्षा दोन अंशांनी जास्त आहे.
तसेच, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी हवामान स्थीर राहण्याची शक्यता आहे. तर शहरात ढगाळ वातावरण राहील आणि मेघगर्जना होईल, असे अधिका-याने सांगितले.
हेही वाचा