Latest

Supreme Court : भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालय घेणार लवकरच सुनावणी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सार्वजनिक कार्यकर्त्यांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादेवरील याचिकांवर सुनावणी सुरू करणार आहे. ही सुनावणी 15 नोव्हेंबर 2022 पासून होणार असल्याचे न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने स्पष्ट केले आहे. ही माहिती देत असताना असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संविधान, 1950 च्या कलम 19(1)(अ) नुसार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील निर्बंध हे एखाद्या आधीच्या प्रकरणाचा आधार घेऊन निश्चित केले जाईल.

सरकारच्या विरोधात बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दावे (Supreme Court)

या खंडपीठात न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती एएस बोपण्णा, व्ही रामसुब्रमण्यम आणि बीव्ही नागरथना यांचा समावेश आहे. एखादा राजकीय नेता किंवा केंद्र सरकारच्या कायद्याच्या आणि धोरणाच्या विरोधात बोलण्यासाठी 'भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा' हक्क सांगू शकतो का? याचा घटनेत समावेश आहे. याबाबत या सुनावणीत स्पष्ट होईल.

उत्तर प्रदेशचे तत्कालीन मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी बुलंदशहर सामूहिक बलात्कार प्रकरणाला समाजवादी पक्षाच्या माजी सरकारला बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र असल्याचे मत व्यक्त केले होते. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एप्रिल 2017 मध्ये जेव्हा हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले तेव्हा अॅमिकस क्युरीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, मंत्री सामूहिक जबाबदारीच्या घटनात्मक आदेशांना बांधील आहेत. त्याचबरोबर ते सरकारच्या धोरणाच्या विरोधात बोलू शकत नाहीत.

डिसेंबर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बुलंदशहर सामूहिक बलात्कार प्रकरणी खान यांची बिनशर्त माफी स्वीकारली होती. खान यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने विचारले होते की एखादा पदाधिकारी संवेदनशील मुद्यांवर सरकारच्या धोरणाच्या विरोधात वैयक्तिक भाष्य करू शकतो क? ज्यामुळे संकट निर्माण होऊ शकते.

काय आहे बुलंदशहर मधील बलात्कार प्रकरण

सहा वर्षांपूर्वी मध्यरात्री ही घटना घडली. एक 35 वर्षीय महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बुलंदशहर जिल्ह्यात दरोडेखोरांच्या एका गटाने कथितरित्या सामूहिक बलात्कार केला. पीडित महिला नोएडाहून शाहाजहांपूरला जात होती. नोएडा आणि बुलंदशहरला जोडणाऱ्या NH-9 वरील दोस्तपूर गावात सायकल दुरुस्तीच्या दुकानाजवळ वाटेत चोरट्यांनी त्यांची कार अडवली. त्यानंतर जवळपास तीन तास आई आणि मुलीवर बलात्कार करून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT