New Attorney General for India : भारताच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ वकील आर वेंकटरामाणी यांची नियुक्ती | पुढारी

New Attorney General for India : भारताच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ वकील आर वेंकटरामाणी यांची नियुक्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ वकील आर वेंकटरामाणी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवीन महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारतीय कायदा आयोगाचे सदस्य आहेत. वेंकटरामाणी हे तीन दशकांहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. याशिवाय त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, विद्यापीठ आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रतिनिधित्व केले आहे. (New Attorney General for India)

वेंकटरामाणी यांनी जुलै 1977 मध्ये बार कौन्सिल ऑफ तामिळनाडूमध्ये प्रॅक्टिस सुरू केली, 1979 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 1997 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामांकित केले. 2010 मध्ये त्यांची विधी आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2013 मध्ये त्यांना कायदा आयोगाचे सदस्य म्हणून आणखी एक टर्म मिळाली होती.

हेही वाचा

Back to top button