Latest

Kamal Haasan : साऊथच्या ‘या’ सुपरस्टारने ‘विक्रम’साठी इतके कोटी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : साऊथचा सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) आगामी 'विक्रम' (Vikram) चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. त्यांचा 'विक्रम' हा चित्रपट आज थिएटरमध्ये दस्तक देत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. सध्या दुबईतील बुर्ज खलिफावर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याबबातचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तर या धमाकेदार चित्रपटासाठी कमल हासन यांनी तगडे मानधनही घेतले आहे.

सुपरस्टार कमल हासनचा (Kamal Haasan) विक्रम (Vikram) हा चित्रपट तमिळ भाषेसोबत हिंदीत रिलीज होत आहे. रिलीज होण्यापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंग आणि ओटीटी राइट्मधून २०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात कमल हसनसोबत अभिनेता विजय सेतुपती, लोकेश कनगराज, फहद फासिल आणि अनिरुद्ध यांनी धमोकदार भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात भरपूर अॅक्सीन सीन दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात कमल हासन यांनी अभिनयासोबत निर्माती देखील केली आहे. परंतु, या चित्रपटासाठी कलाकारांनी फिस, मानधन किती घेतले आहेत हे जाणून घेवूयात…

सूत्राच्या माहितीनुसार, या चित्रपटात काम करण्यासाठी कमल हसन यांनी ५० कोटी, अभिनेता विजय सेतुपतीने १० कोटींचे मानधन घेतलं आहे. तर लोकेश कनगराजने ८ कोटी रुपये, फहद फासिलने च४ कोटी रुपये आणि अनिरुद्ध ४ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

'विक्रम' चित्रपटाचा ट्रेलर जगातील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफाच्या पडद्यावर रिलीज करण्यात आला आहे. यावेळी कमल हसन स्वतः त्यांच्या टीमसह ट्रेलरच्या लॉन्चला उपस्थित होते. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विक्रम चित्रपटाचे एकूण बजेट १५० कोटींचे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. हा चित्रपट बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाला टक्कर देणार आहे. यामुळे विक्रम चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT