भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (HBD Virat) आज 5 नोव्हेंबर रोजी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. आक्रमक बाणा असलेल्या विराट कोहलीचे (HBD Virat) नाव अनुष्का शर्माच्या प्रेमात पडण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. यामध्ये ब्राझीलच्या मॉडेलचा सुद्धा समावेश आहे.
विराट कोहलीचे नाव तमिळ अभिनेत्री साक्षी अग्रवालसोबत जोडले गेले. साक्षी हे विराटचे पहिले प्रेम होते. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. लवकरच दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
विराटचे नाव अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींसोबत जोडले गेले असून त्यापैकी एक म्हणजे संजना गलरानी. कोहली संजनासोबत टेनिस खेळायचा आणि लाँग ड्राईव्हवर जायचा. या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले. तथापि, हे नाते देखील फार काळ चालले नाही.
विराट कोहलीचे नाव बाहुबली अभिनेत्री तमन्ना भाटियासोबतही आले. विराट आणि तमन्ना भाटिया एका जाहिरातीसाठी एकत्र आले तेव्हा दोघांचे नाव समोर आले. 2012 मध्ये दोघांचे नाते चांगलेच चर्चेत होते, पण नंतर दोघेही आपापल्या कामात व्यग्र झाले आणि दोघांनी आपले मार्ग वेगळे केले.
विराटसोबत ब्राझीलची मॉडेल इझाबेल लेइटचेही नाव जोडले गेले. दोघे सिंगापूरमध्ये डेट करताना दिसले होते. दोघे काही महिने एकत्र राहिले आणि नंतर वेगळे झाले.
विराट कोहलीसोबत (HBD Virat) सारा जेनचेही नाव जोडले गेले होते. दोघांना अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले जात होते. नंतर साराच्या शेड्युलमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी वेगळे केले.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट 2013 मध्ये भेटले होते जेव्हा दोघे एका शॅम्पूची जाहिरात करत होते. इथून दोघांनी डेटिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना वामिका नावाची मुलगी आहे.
हे ही वाचलं का?