Latest

Diwali Gift : हरियाणातील ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी गिफ्ट म्हणून कार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी जवळ आली असल्याने सर्व नोकरदार वर्ग आपल्या कार्यालयाकडून दिवाळी भेटवस्तू मिळण्याची वाट पाहत आहेत. बऱ्याचदा काही कर्मचाऱ्यांना दिवाळीला भेटवस्तू म्हणून मिठाई आणि काही घरगुती उपकरणे मिळतात. पण  हरियाणातील एका औषध कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार भेट दिली आहे.

संबंधित बातम्या : 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हरियाणातील पंचकुला येथील एका औषध कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून एक कार भेट दिली. कंपनीचे मालक एमके भाटिया यांनी त्यांच्या कंपनीच्या १२ 'स्टार परफॉर्मन्स' कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या. मिट्स हेल्थकेअर (Mitskart) असे या कंपनीचे नाव असून नजीकच्या काळात आणखी ३८ कार गिफ्ट करण्याची योजना आहे. भाटिया यांनी त्यांच्या ऑफिस बॉयसह १२ कर्मचाऱ्यांना नवीन टाटा पंच कार भेट दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माध्यमांशी बोलताना भाटिया यांनी सांगितले की, त्यांच्या कर्मचार्‍यांचे समर्पण आणि कठोर परिश्रम पाहून ते प्रभावित झाले आहेत. त्यामुळे या दिवाळीला कर्मचाऱ्यांना एक विशेष भेट देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कंपनी सुरू केली तेव्हापासून यातील काही कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत. या कर्मचाऱ्यांनी कंपनीशी एकनिष्ठ राहून कंपनीच्या विकासासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे भाटिया यांनी सांगितले.

भाटिया म्हणाले की, "कंपनीने खूप चढ-उतार पाहिले आहेत. हे कर्मचारी आमच्यासोबत कायम राहिले, त्यांनी कंपनीला पुढे जाण्यास नेहमी मदत केली, ते आमचे स्टार आहेत. महिनाभरापूर्वी गाड्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या, आता १२ कर्मचाऱ्यांना कार देण्यात आल्या आहेत ही संख्या ५० पर्यंत वाढवण्याची योजना आहे."

कार भेटवस्तू मिळाल्याने या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. त्यांच्यापैकी काहींना गाडी कशी चालवायची हे देखील माहित नाही. टाटा पंच ही एंट्री-लेव्हल मायक्रो एसयूव्ही आहे, जी २०२१ मध्ये लॉन्च झाली होती. या कारची किंमत सुमारे सहा लाख रूपयांपासून सुरू होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT