नवी मुंबई; : ऐन दिवाळी सणासुदीच्या तोंडावर सुकामेवा, रवा, मैदा, बेसन, पोहे, गुळ, साखर, खोबऱ्यासह डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ३५ ते ४० टक्क्यांनी फराळाच्या वस्तूसह जीवनाश्यक वस्तू महागल्या आहेत. तुरडाळ १९० तर इतर सर्व डाळी १२० ते १४० रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. तर एपीएमसी घाऊक बाजारात हीच दरवाढ दहा टक्के इतकी आहे. फराळासाठी लागणारे साहित्य महाग झाल्याने रेडीमेड फराळाचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत किलोमागे १०० ते १२० रुपयांनी महागले आहेत.
"किरकोळ बाजारात तुरडाळ कडाडली आहेच शिवाय इतर डाळींचे दर १२० ते १४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात किलोमागे ४० ते ४५ रुपये सर्वसामान्यांना एक किलो डाळीसाठी जादा मोजावे लागत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेलसह रायगड जिल्ह्यांत रोज किमान ११० गाडी डाळींचा पुरवठा एपीएमसी घाऊक बाजारातून होते. एपीएमसीतील घाऊक दाणा बाजारामध्ये डाळींची आवक काही प्रमाणात घटली आहे.
वस्तूंचे दर ऐन दिवाळीत ऐन दिवाळीन सर्वसामान्य गृहीणींचे बजेट कोलमडले आहे. पावसामुळे उत्पादनात घट झाल्याने ही दरवाढ झाल्याची माहिती घाऊक व्यापारी देतात. तर एपीएमसीत गुळ, साखर, रवा, मैदा, बेसण किलोमागे पाच ते दहा रुपयांनी तर किरकोळ बाजारात पाच ते १५ रुपयांनी किलोमागे दरवाढ झाली आहे.
सणासुदीत फराळासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही महाग झाल्या आहेत. रवा, मैदाची मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून होते. गेल्या चार महिन्यांत तीन ते चारवेळा डाळीच्या दरात चढउतार झाली. सुकामेवा महाग झाला असून काजू, बदाम, पिस्ता किलोमागे घाऊकपेक्षा दीडशे ते दोनशे रुपयांनी महागला आहे..
तुरडाळ १८० १९०
चणाडाळ ७६ ते ७८ १००
मुगडाळ १०५ ते ११५ १३०
मटकी ९२ ते १५६ १४०
बेसन ९६ ते १०४ १२०
मैदा ३६ ते ४४ ६०
रवा ३६ ते ४० ५५
पोहे ४० ते ४५ ७०
साखर ४२ ते ४४ ४८
गुळ ६० ते ६५ ८०
खोबरे १४० ते १६० २००
बदाम ६५० ते ७५० ९००
काजू ४०० ते ८०० ९००
मनुका ३०० ते ३७५ ५००
आक्रोड ५०० ते १०० ९०० ते १०००