Amitabh Bachchan  
Latest

81 Years @ Amitabh Bachchan : अमिताभ ८० पार, ‘जलसा’तून अनवाणी येत चाहत्यांना अभिवादन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वयाची ऐंशी पार केलीय. बिग बींनी ८१ व्या वर्षात पदार्पण केलं. अँग्री यंग मॅन अशी ओळख बनवणाऱ्या अमिताभ बच्चनने १९६९ मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. (81 Years @ Amitabh Bachchan ) त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. परंतु, अमिताभ बच्चन यांनी जंजीर, शोले आणि दीवार यासारखे एकापेक्षा एक चित्रपट देऊन सर्वांची मने जिंकली. आज ११ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान, वाढदिवसाच्या मध्यरात्री चाहत्यांसाठी त्यांनी अनोखी भेट दिली. (81 Years @ Amitabh Bachchan)

संबंधित बातम्या –

अर्ध्य़ा रात्री जलसाच्या गेटवर येऊन ते चाहत्यांनी भेटले आणि नेहमीप्रमाणे अनवाणी ते डायसवर उभे राहून चाहत्यांचे आभार मानले. अमिताभ बच्चन यांनी ट्रॅक सूट घातलं होतं आणि डोक्यावर टोपी असा लूक केला होता. नव्या नवेली नंदा आणि श्वेता बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांचा हा लूक दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी हात जोडून आपल्या चाहत्यांना नमस्कार केला आणि काही लोकांची विचारपूस केली आहे. अमिताभ बच्चन नेहमी चाहत्यांच्या भेटीला येताना आपल्य़ा घरातून येताना अनवाणी येतात. जेव्हा एका चाहत्याने त्यांना विचारले की, ते अनवाणी का येतात, तेव्हा खूप सुंदरपणे त्यांनी उत्तर दिलं की, काय तुम्ही मंदिरात चप्पल घालून जाता?

नव्या – श्वेताने शेअर केले खास फोटो

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा यांनी बिग बींच्या बर्थडेला काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. श्वेता बच्चनने एका कोलाज पोस्ट केला आहे, यामध्ये ती अमिताभ यांची गलाभेट घेताना दिसतेय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT