Amitabh Bachchan : याआधी मरणाच्या दारातून परतले आहेत अमिताभ | पुढारी

Amitabh Bachchan : याआधी मरणाच्या दारातून परतले आहेत अमिताभ

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमिताभ बच्चन वयाच्या ८० व्या वर्षीही ६ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ब्रह्मास्त्रमध्ये तर त्यांनी ॲक्शन्स सीन्स केले आहेत. त्यांचा आगामी चित्रपट प्रोजेक्ट- के च्या एका ॲक्शन सीन शूटसाठी हैदराबादमध्ये त्यांच्या बरगडीला दुखापत झालीय. (Amitabh Bachchan) या घटनेत अमिताभ बच्चन यांच्या मांसपेशी फाटल्या आहेत. त्यांना श्वास घेतानाही त्रास होतोय. या घटनेनंतर तत्काळ शूटिंग थांबवून अमिताभ यांना उचारासाठी मुंबईत पाठवण्यात आलं. या घटनेची माहिती स्वत: अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली. ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधीही अमिताभ यांच्यासोबत सेटवर घटना घडलीय. ४१ वर्षांपूर्वी कुलीच्या सेटवर अमिताभ जखमी झाले होते. आतडी फाटल्यामुळे इतकं इन्फेक्शन पसरलं होतं की, डॉक्टर्सना इमरजन्सीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागली होती. (Amitabh Bachchan)

कुलीच्‍या शूटिंगची आठवण काढत एकदा अमिताभ म्‍हणाले होते की, गोष्‍ट सन १९८३ ची. चित्रपट ‘कुली’चे शूटिंग बंगळुरूमध्‍ये सुरू होते. (या चित्रपटात ‘कुली’ अमिताभजींचा बिल्‍ला नं. ७८६ होता.) २ वाजताची शिफ्‍ट होती. ‘आम्‍ही कुलीचे शूटिंग करत होतो. सकाळी ७-८ वाजल्‍यापासून रात्री १०-११ वाजेपर्यंत थांबत होतो. संपूर्ण यूनिट कंटाळत असे. कोणीतरी म्हटलं की, ‘मनमोहनजी यांना सांगा की, संपूर्ण यूनिटला ब्रेक मिळालेला नाही. त्‍यावेळी अमितजी स्‍वत: हे ऐकून चिंतीत झाले आणि म्‍हणाले की, पाहुया काय करता येईल?’

या शूटिंगच्‍या काही दिवसानंतर अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सर यांच्‍यामध्‍ये आणखी एक ॲक्शन सीन शूट करायचा होता. त्‍यात पुनीत आणि अमिताभ बच्चन यांना एकमेकांना ठोसा मारायचा होता. यावर ऋषी कपूर म्‍हणाले होते, ‘ २४ जुलै, १९८२ रोजी बंगळुरूमध्‍ये ‘कुली’चं शूटिंग सुरू होतं. सीनमध्‍ये अमिताभ बच्चन यांना पुनीतच्‍या ठोशामुळे पोटात गंभीर दुखापत झाली होती. अमितजींना सीन करताना पोटात खूप दुखू लागलं. पण, अमितजी काहीच बोलले नाहीत. सीन पूर्ण झाल्‍यानंतर ते बागेत जाऊन झोपले. कोणीतरी मला म्‍हणाले की, अमितजींना काय झालयं पाहा, ते बागेत झोपले आहेत? पण, मला वाटलं की, असेच झोपले असतील. परंतु, नंतर समजलं की, त्‍यांना दुखापत झालीय. ‘कुली’च्‍या सेटवर अपघात झाल्‍यानंतर अमिताभ यांच्‍यावर ६१ दिवस हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरू होते.

२५ जुलैला अमिताभ यांची तब्‍येत आणखी बिघडली. एक्स-रे काढण्‍यात आला. परंतु, डॉक्टर्सना काही समजेना. अमिताभ यांना झोपेची गोळी देण्‍यात आली. हे वृत्त समजताच अमिताभ यांची आई तेजी, पत्नी जया आणि त्‍यांचे भाऊ अजिताभ बेंगलोरला (आताचे बंगळुरू) पोहोचले. ते अमिताभ यांना मुंबईत घेऊन जाणार होते, परंतु, डॉक्टर्सनी परवानगी दिली नाही.

तिसर्‍या दिवशी म्‍हणजेच २६ जुलैला अमिताभजींची स्थिती आणखी बिघडली. त्‍यावेळी वेलोरचे प्रसिध्‍द सर्जन एचएस भट्ट तेथे आले होते. डॉक्‍टर्सनी आग्रह केल्‍यानंतर डॉ. भट्ट यांनी अमिताभ यांची तपासणी केली. रिपोर्ट्‍स पाहिल्‍यानंतर त्‍यांनी अमिताभ यांच्‍यावर ऑपरेशन करावे लागणार असल्‍याचे सांगितले. अमिताभजींची प्रकृतीत सुधारणा न झाल्‍याने २७ जुलै, १९८२ला डॉक्टर्सनी ऑपरेशन करण्‍याचा निर्णय घेतला. ऑपरेशनच्‍यावेळी लहान आतड्‍यांना दुखापत झाल्‍याचे दिसले. त्यावेळी अमिताभ यांची प्रकृती गंभीर होती.

२८ जुलैला अमिताभ यांना न्‍यूमोनिया झाला होता. अमिताभ यांची प्रकृती बिघडली होती. त्‍यानंतर त्‍यांना मुंबईला उपचारासाठी पाठवण्‍याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला. क्रेनच्‍या मदतीने एअरबसमधून अमिताभ यांना मुंबईला नेण्‍यात आले. रात्री ११ वाजता बेंगलोरहून निघालेली एअरबस ३१ जुलैला पहाटे ५ वाजता मुंबईत पोहोचली. त्‍यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलच्‍या दुसर्‍या मजल्‍यावर स्पेशल वॉर्डमध्‍ये ठेवण्‍यात आलं होतं.

१ ऑगस्‍टच्‍या सकाळपर्यंत अमिताभ बच्‍चन यांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्‍यांच्‍या प्रकृतीसाठी संपूर्ण जगभरातून प्रार्थना करण्‍यात आल्‍या होत्‍या. कुलीच्‍या सेटवर अमिताभ यांना झालेल्‍या अपघातानंतर ते अक्षरश: जिवावरच्‍या संकटातून बचावले होते. तब्‍येतीत सुधारणा झाल्‍यावर त्‍यांनी जुहूच्‍या त्‍यांच्‍या प्रतीक्षा बंगल्‍याच्‍या खिडकीतून चाहत्‍यांना रोज दर्शन देणे सुरू केले. अर्थात गेल्‍या काही वर्षांपासून हे दर्शन महिन्‍यातील एका रविवारपुरते मर्यादित झाले आहे.

अमिताभनी एकदा ट्‍विट करत म्‍हटलं होतं की, ‘आमचे मुस्लिम भाऊ आणि बहिणींसाठी खूप पवित्र असणार्‍या ७८६ या नंबरने चित्रपट कुलीमध्‍ये माझा जीव वाचवला होता.’

Back to top button