Latest

वैद्यकीय चमत्कार | अपंग पेंटरला मिळाले २ हात; दिल्लीत हातांचे प्रत्यारोपण यशस्वी

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानवी बुद्धीला थक्क करणारी प्रगती वैद्यकीय क्षेत्रात होत आहे. याचीच अनुभूती दिल्लीत आली आहे. राजधानीतील एका खासगी रुग्णालयात हातांचे प्रत्यारोपण यशस्वी झाले आहे. ४ वर्षांपूर्वी एका अपघातात दोन्ही हात गमावलेल्या एका पेंटरला शस्त्रक्रियेतून दोन्ही हात बसवता आले आहेत. या घटनेत ब्रेन डेड झालेल्या एका महिलने तिचे अवयवदान केल्याने या पेंटरला या महिलेचे हात बसवता आले आहेत. (Hand transplant in Delhi)

दिल्लीतील गंगा राम हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या पेंटरचे वय ४५ आहे. २०२०मध्ये रेल्वे अपघातात त्याने दोन्ही हात गमावले होते. (Hand transplant in Delhi)

काही दिवसांपूर्वी मीना मेहता नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. मेहता दिल्लीतील एका शाळेतील प्रशासकीय प्रमुख होत्या. मीना मेहता यांनी जिवंतपणीच अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चार जणांचे जीवन उजळून निघाले आहे. मीना यांची किडनी, लिव्हर आणि डोळे इतर तिघांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. तर मीना यांचे हात या अपंग पेंटरला प्रत्यारोपित करण्यात आले.

हातांचे प्रत्यारोपण ही अतिशय किचकट शस्त्रक्रिया होती, असे या हॉस्पिटच्या वतीने सांगण्यात आले. ही शस्त्रक्रिया १२ तास चालली. दात्याचे हात आणि या अपंगाचे हात जोडण्यासाठी डॉक्टरांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. प्रत्येक रक्तवाहिनी, स्नायू, टेंडॉन आणि चेतातंतू यशस्वीरीत्या जोडण्यात आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT