Latest

Gujarat Murder Case : पत्नीची हत्या केली, मृतदेहाजवळ बसून केला व्हिडिओ, म्हणाला पर्यायच नव्हता म्हणून…

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील राजकोटमध्ये पतीने पत्नीचे डोके दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर रक्ताने माखलेल्या मृतदेहाजवळ बसून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात हत्या करण्याचे कारण सांगून त्याने व्हिडिओ हाऊसिंग सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरल केला. अंबिका जिरोली (वय ३४) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी पती गुरुपा जिरोली याला ताब्यात घेतले आहे. (Gujarat Murder Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी होते. २००३ पासून राजकोट येथे स्थायिक झाले. नाना मौवा रस्त्यावरील अंबिका टाउनशिपमधील शांतीवन निवास अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. रस्ते बांधणीचा ते व्यवसाय करायचे. घटनेच्या दिवशी गुरुपा याने पहाटे साडेपाच वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. (Gujarat Murder Case)

हत्येनंतर गुरुपा मृतदेहाजवळ सुमारे तीन तास बसून राहिला. मृतदेहाशेजारी त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये तो आपल्या कृत्याबद्दल माफी मागताना आणि पत्नीचे तिच्या मित्रांसोबत अफेअर असल्याने तिला मारण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगताना दिसत आहे. त्याने आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेआर केला.

त्यांना १७ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. विवाहबाह्य संबंधमुळेच पत्नीची हत्या केल्याचे सांगताना त्याने याबाबत तिला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने ऐकले नाही. मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर विभक्त होऊ असे सांगितले. परंतु तेही पत्नीला  मान्य नव्हते, असे सांगत आहे.

सहायक पोलिस आयुक्त बी.जे. चौधरी यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि आरोपीचा मोबाईल फोन फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवल्याचे सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT