पुढारी ऑनलाईन: शाळेतील मुलांचे नृत्य आणि गाण्याचे व्हिडिओ वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हिडिओंमध्ये मुलांमध्ये असलेले अप्रतिम टॅलेंट आपणाला पाहायला मिळत असते. ते आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकतात. एका सरकारी शाळेतील मुलाचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलगा नोरा फतेहीच्या गाण्यावर अप्रतिम डान्स करत आहे. लोक हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ छत्तीसगडमधील एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचा आहे. यामध्ये शाळेच्या मैदानात मुले उभी आहेत. दरम्यान, एक मुलगा गर्दीपासून दूर उभा असल्याचे दिसते. तो स्काय ब्लू शर्ट आणि निळी पँट घालून उभा आहे. त्याने डोक्यावर टोपीही घातली आहे. अचानक नोरा फतेहीचे 'दिलबर-दिलबर' गाणे तेथे वाजू लागते. गाणे वाजताच मुलगा नाचू लागतो. तो मुलगा ज्या पद्धतीने डान्स करतो ते पाहून तो प्रोफेशनल डान्सर असल्यासारखे वाटते.
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी डॉ. नवज्योत सिमी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, छत्तीसगडमधील सरकारी शाळेतील मुलाची प्रतिभा. या व्हिडीओमध्ये तो मुलगा प्रत्येक स्टेप छान करतो. लोक त्याच्या टॅलेंटला सोशल मीडियावर खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 2 लाख वेळा पाहिला गेला आहे.
हेही वाचा: