Google Doodle celebrates New Year 
Latest

New Year’s Eve : नवीन वर्षाचं औचित्य साधत गूगलच डूडल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरूवात होते. तर इंग्रजी कालगणनेनुसार १ जानेवारीला नवीन वर्षाची (New Year's Eve) सुरूवात होते आणि ३१ डिसेंबरला वर्षाचा शेवट होतो. आज  ३१ डिसेंबर २०२१, २०२१ या वर्षातील शेवटचा दिवस. गुगल नेहमीच आकर्षक आणि अर्थपूर्ण डूडल बनवून यूजर्सचे लक्ष वेधत असते. आज गुगलने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी २०२१ वर्षातील शेवटच्या दिवशी हटके असं डूडल केलं आहे.

 हटके गुगल डुडलं New Year's Eve

प्रत्येतकजण वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्ष आपापल्यापरीने साजरे करत असते. गुगलने ही  गुगलने नवीन वर्षाचं औचित्य साधून २०२२ या नववर्षाच खास असं डूडल बनवलं आहे. २०२१ या सरत्या वर्षाला निरोप देत आपण २०२२ या नवीन वर्षात काही तासांतच प्रवेश करणार आहोत. अॅनिमेटड डुडल  गुगल यूजर्सना भावले आहे.  डुडल मध्ये Google या शब्दातील G या इंग्रजी अक्षरावर छान पार्टी टोपी घातली आहे. O या इंग्रजी अक्षरावरही २०२१ लिहिलेली छोटी कॅंडी दाखलली आहे. डुडलला रात्री लाईव्ह केलं आहे. ती कॅंडी आज रात्री १२ वाजता पॉप होणार आहे.

Google Doodle celebrates New Year

डुडलवर क्लिक केल्यावर काय दिसेल? 

न्यू इयर सेलिब्रेशन थीम असलेल्या  डुडलवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा एक पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला न्यू इयर डूडलची माहिती दिली आहे. पेजवरती रंगबेरंगी पेपर तुकडे (Colourful sparkle) वरून खाली येताना दिसतील. पेजच्या  कोपर्‍यात  दिली एक कोन दिला आहे. या कोनवर क्लिक केल्यावर फटाक्यासारखा आवाज येईल.

असं होतं ३१ डिसेंबर २०२० चं गुगल डूडल 

गुगल नेहमीच आकर्षक आणि अर्थपूर्ण डूडल बनवून यूजर्सचे लक्ष वेधत असते. ३१ डिसेंबर २०२० लाही गुगलने २०२१ या नवीन वर्षाचं स्वागत करत असताना हटके असं डूडल बनवलं होतं. डूडलंमध्ये Google  या इंग्रजी शबदाला लायटिंग दिसेल आणि Google मधील O या अक्षरावर घर दाखवलं होतं. त्याचबरोबर या घरावर एक घड्याळ दाखवले होते.

हेही वाचा ; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT