नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज टीम डेव्हिडने 19 व्या षटकात नवीन उल हकच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी केली. डेव्हिडने चौकार-षटकारांचा पाऊस पाडून या षटकात 19 धावा कुटल्या. मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात नवीनने 4 षटकांत 37 धावा दिल्या. नवीनच्या गोलंदाजीवर मुंबईच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. मात्र, असे असूनही मुंबई इंडियन्सचा या सामन्यात पाच धावांनी पराभव झाला. शेवटच्या षटकात मोहसीन खानने अप्रतिम गोलंदाजी करून लखनौला विजय मिळवून दिला. (Aly Goni )
त्यानंतर टीव्ही अभिनेता अली गोनीने एक ट्विट करून क्रीडाविश्वात खळबळ उडवून दिली. गोनीने केलेले ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून, चाहत्यांनी यावर मीम्ससह भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. (Aly Goni)
गतवर्षी मोहसीन खानच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाली. त्याच्या डाव्या खांद्यावर रक्ताच्या गुठल्या जमा झाल्या होत्या. या शस्त्रक्रियेमुळे तो स्थानिक आणि आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही.
सामना संपल्यानंतर तो म्हणाला, एक वेळ अशी होती, जेव्हा मी क्रिकेट सोडणार होतो. माझ्या आजारपणामुळे मला तसा निर्णय घेण्याची वेळ आली होती. त्या गोष्टींची आठवण आल्यावर आजही खूप भीती वाटते. कारण डॉक्टर म्हणाले होते, जर मी एका महिन्यानंतर शस्त्रक्रिया केली असती, तर माझे हातही कापावे लागले असते.
नवीन भावा तू मात्र फक्त आंबा खा. चाहते यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी नवीन उल हकने आंबा खात असल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यामुळे नवीनची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. याशिवाय विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या वादविवादाचीही आयपीएलमध्ये खूप चर्चा रंगली होती.
हेही वाचा;