Gold Silver Price Today 22nd November : सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव २८६ रुपयांनी स्वस्त होऊन प्रति १० ग्रॅम ४८,९४९ रुपयांवर आला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २६२ रुपयांनी कमी होऊन ४४,८३७ रुपयांवर आला. सोन्यासह चांदीही घसरली आहे. चांदीचा भाव ७५९ रुपयांनी स्वस्त होऊन ६५,७२७ रुपयांवर (प्रति किलो) आला आहे. सणासुदीनंतर सोन्याच्या भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,२३५ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. त्यात आज सोमवारी २८६ रुपयांची घसरण झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Silver Price Today सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४८,९४९ रुपये, २३ कॅरेट सोने ४८,७५३ रुपये, २२ कॅरेट सोने ४४,८३७ रुपये, १८ कॅरेट ३६,७१२ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २८,६३५ रुपये होता. चांदीचा प्रति किलो दर ६५,७२७ रुपये होता. (हे सोमवार दि. २२ नोव्हेंबर दुपारपर्यंतचे अपडेटेड दर आहेत).
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.