पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐन लग्नसराईत सोन्याच्या दराने (Gold rate today) अनेकांना घाम फुटला आहे. सोन्याच्या दराने पुन्हा एकदा ५४ हजारांचा टप्पा पार केला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति १० ग्रॅम ५४,४६२ रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा प्रति किलो दर ६७,९६९ रुपयांवर गेला आहे. मंगळवारच्या तुलनेत सोने बुधवारी सुमारे ४०० रुपयांनी महागले आहे. सोमवारी सोन्याचा दर ५४ हजारांच्या खाली होता. पण दोन दिवसांत सोन्याने ५४ हजारांवर झेप घेतली आहे. जर तुमच्या घरात लग्न आहे आणि तुम्ही सोने खरेदी असाल तर आजचे दर जाणून घ्या.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम दर ५४,४६२ रुपये, २३ कॅरेट ५४,२४४ रुपये, २२ कॅरेट सोने ४९,८८७ रुपये, १८ कॅरेट ४०,८४६ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३१,८६० रुपयांवर खुला झाला आहे.
लग्नसराईत सोन्याला मागणी वाढते. पुढील काही दिवसांत सोन्याचे दर चढेच राहणार असल्याचे संकेत सराफा बाजारातील तज्ज्ञांनी दिले आहेत. दरम्यान, गुंतवणुकदारांना अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या दरवाढीच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे. त्याआधी सोने वधारले आहे. MCX वर सोन्याचे फ्यूचर्स ०.१६ टक्क्यांनी वाढून दर प्रति १० ग्रॅम ५४,८२८ रुपयांवर पोहोचला. तर चांदी २७६ रुपयांनी वाढून प्रति किलो ६९,०५१ रुपयांवर गेली आहे. (Gold rate today)
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
हे ही वाचा :