संग्रहित छायाचित्र 
Latest

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोन्याच्या दरात (Gold Rate Today) वाढ सुरुच असून दर ५३ हजारांजवळ पोहोचला आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या दर वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारतही सोने तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,८७७ रुपयांवर पोहोचला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी (दि.१५) सुरुवातीच्या व्यवहारात शुद्ध सोन्याच्या दरात ४७७ रुपयांची तेजी दिसून आली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,८७७ रुपयांवर खुला झाला आहे. तर २३ कॅरेट ५२,६६५ रुपये, २२ कॅरेट ४८,४३५ रुपये, १८ कॅरेट ३९,६५८ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,९३३ रुपयांवर खुला झाला आहे. चांदीचा प्रति किलो दर ६२,४६७ रुपयांवर गेला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,७४३ रुपयांवर खुला झाला. याआधीच्या सत्रात हा दर ५२,७१८ रुपयांवर बंद झाला होता. ५२,९२९ आणि ५२,७०३ रुपयांदरम्यान व्यवहार केल्यानंतर सोन्याच्या दरात १९८ रुपयांची तेजी आली. यामु‍ळे सोने ५२,९१६ रुपयांवर व्यवहार करत आहे. (Gold Rate Today)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तेजीत

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीबाबत सौम्य भूमिका घेईल या अपेक्षेने सोने तेजीत आले आहे. स्पॉट गोल्ड ०१. टक्क्याने वाढून प्रति औंस १,७७२ डॉलरवर पोहोचले आहे. दरम्यान, जगातील ६ प्रमुख चलनांच्या तुलनेत यूएस डॉलर इंडेक्स मजबूत झाला आहे.

लग्नसराईच्या सुरुवातीलाच सोने महागले आहे. काल सोमवारी (दि.१४) शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेट सोने ५२,५६० रुपयांवर होते. सोन्याच्या दरात आणखी तेजी येणार असून ते ५६ हजार रुपयांवर जाऊ शकते, अशी शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT