गोवा

Goa Election Update : फातोर्ड्यात विजय सरदेसाई आघाडीवर, दामू नाईक पिछाडीवर

अनुराधा कोरवी

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : मतमोजणीच्या पहिल्या फेरीत फातोर्डा मतदार संघातून गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई १६६३ मते घेऊन आघाडीवर आहेत. तर भाजपचे दामू नाईक हे १०७० मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर पिछाडीवर आहेत.

विजय सरदेसाई आणि दामू नाईक त्यांच्या मागोमाग आरजीच्या वेलेरी फर्नांडिस यांना २६४ मते प्राप्त झाली आहेत. तर तृणमूलच्या सेवूला वाज यांना १४५ मते पहिल्या फेरीत प्राप्त झाली आहे. सरदेसाई हे दोन वेळा सदर मतदारसंघात निवडून आले आहे. ते तिसऱ्यांदा निवडणुकीत उतरले आहेत.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT