Tilari water  
गोवा

Tilari water supply-तिळारीचे पाणी बंद; बार्देशला फटका

मंत्री रोहन खंवटे : कथित पोलिस गैरवर्तनाचा तीव्र निषेध

पुढारी वृत्तसेवा

पणजी : तिळारी धरणातून होणारा पाणीपुरवठा काही काळासाठी बंद केल्यास त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या हंगामात तिळारीचा पाणीपुरवठा बंद करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

रोहन खंवटे बार्देश तालुक्यावर बार्देश तालुक्यातील अनेक भाग तिळारीच्या पाणीपुरवठ्यावर वलंबून आहेत. त्यामुळे पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. सध्याची परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट या प्रकरणाची केले.

दरम्यान, पर्वरी येथील रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या कथित पोलिस गैरवर्तनाच्या घटनेचाही खंवटे यांनी तीव्र निषेध केला. निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खंवटे यांनी केली.

नियमानुसार कारवाई व्हावी !

पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पर्वरीमधील घटनेची योग्य चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई व्हावी, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT