मुंबई खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करताना डॉ. प्रफुल हेदे व क्लायडे क्रास्टो. pudhari photo
गोवा

Supriya Sule Goa Meeting | खासदार सुळे यांच्यासोबतच्या बैठकीत ठरली रणनीती

खासदार सुळे यांच्यासोबतच्या बैठकीत ठरली रणनीती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोवा विधानसभेच्या २०२७ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद परावर गट) उतरणार आहे. नुकतीच मुंबई येथे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श. प.) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या सोबत गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रफुल हेदे व गोवा प्रभारी तथा राष्ट्रीय प्रवक्ते क्लायडे क्रास्टो यांची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती ठरविण्यात आली आहे.

क्लास्टो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत गोव्यातील विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली. तसेच संघटनात्मक बाबींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही काँग्रेससोबत युती करून काही जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा करणार असल्याचे क्रास्टो यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT