पणजी : एसटी समाजाच्या नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे, प्रकाश वेळीप, प्रभाकर गावकर, वासुदेव मेंग गावकर, मोहन गावकर व इतर नेते. 
गोवा

ST community supports BJP-एसटी समाज भाजपच्या पाठीशी ठाम : नेत्यांचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घेतली भेट

एसटी समाज भाजपच्या पाठीशी ठाम : नेत्यांचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घेतली भेट

पुढारी वृत्तसेवा

पणजी :

गोव्यातील गावडा, कुणबी व वेळीप या आदिवासी (एसटी) समाजाला भारतीय जनता पक्षाच्या केंद्र व राज्य सरकारने २००३ मध्ये एसटीचा कायदेशीर दर्जा देऊन अनेक सवलती दिल्या. आता एसटीला राजकीय आरक्षणही याच भाजपच्या सरकारनी दिले. त्यामुळे यापुढे गोव्यातील एसटी समाज भाजपच्या मागे खंबीरपणे उभा राहील, असे ठाम आश्वासन राज्यातील प्रमुख एसटी नेत्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले.

एसटीसाठी राजकीय आरक्षण देण्याची अधिसूचना जारी झाल्याबद्दल आणि त्यासाठी दिल्लीत वारंवार प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची शुक्रवारी राज्यातील आदिवासी समाजाच्या नेत्यांनी भेट घेऊन आनंद व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना हे आश्वासन दिले. आदिवासी कल्याणमंत्री रमेश

तवडकर यांच्या नेतृत्वाखालील एसटी समाजाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळात आमदार गोविंद गावडे, आमदार आंतोन वाझ, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, गोविंद शिरोडकर, विश्वास गावडे आदींनी डॉ. प्रमोद सावंत यांच्या पणजी येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासह केंद्र सरकारलाही धन्यवाद दिले.

एसटी समाजाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या एसटी विभागाचे अध्यक्ष मोहन गावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने एटीचा दर्जा व आता राजकीय आरक्षण दिले. त्याबद्दल एसटी समाज भाजपच्या दोन्ही सरकारचे आभारी असून, हा समाज भाजपच्या मागे सदैव उभा राहील, अशी ग्वाही यावेळी दोन्ही शिष्टमंडळातील नेत्यांनी मुख्यमंत्र्याना दिली.

दोन महिन्यांत इतर प्रक्रिया पूर्ण

एसटीसाठीच्या राजकीय आरक्षणाची अधिसूचना काढण्यात आलेली आहे. आता मतदारसंघ नेमके कोणते राखीव होतील त्याबाबतची प्रक्रिया दोन ते अडीच महिन्यांमध्ये पूर्ण होईल. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर एसटी समाजाची मागणी मान्य झालेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ही मागणी मान्य केल्याबद्दल संपूर्ण एसटी समाज भाजप सरकारचे तथा डबल इंजिन सरकारचे आभारी आहे, अशी प्रतिक्रिया आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT