Goa - गोवा फॉरवर्डनंतर 'आप' चाही काँग्रेसला धक्का

AAP Deals Blow to Congress After Goa Forward - अरविंद केजरीवाल : काँग्रेसला मतदान करू नका, त्यांचे आमदार भाजपमध्ये जातील
दोनापावला येथे पत्रकार परिषदेत बोलताना आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल. डावीकडून क्रूझ सिल्वा, वाल्मिकी नाईक, आतिषी मार्लिनो, वेन्झी व्हिएगस, संदेश तेलेकर देसाई व इतर. (छाया : समीर नार्वेकर)
दोनापावला येथे पत्रकार परिषदेत बोलताना आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल. डावीकडून क्रूझ सिल्वा, वाल्मिकी नाईक, आतिषी मार्लिनो, वेन्झी व्हिएगस, संदेश तेलेकर देसाई व इतर. (छाया : समीर नार्वेकर)
Published on
Updated on

पणजी : काँग्रेस-गोवा फॉरवर्डमध्ये अनेक वेळा गाठीभेटीनंतरही फॉरवर्डने काँग्रेसबरोबरची युती स्थगित ठेवली. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता आपनेही काँग्रेसवर निशाणा साधत युतीच्या वाटा बंद करून टाकल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपला हरवण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना हादरा बसला आहे.

काँग्रेसला मतदान करू नका, कारण त्यांचे आमदार निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जातील व सरकार स्थापन करतील, अशी जहरी टीका आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. भाजपलाही मतदान करू नका, असे नमूद करत त्यांनी गोवेकरांसमोर आम आदमी पार्टी (आप) हा पर्याय आहे, असा दावा केला. त्यामुळे विरोधी पक्षांच्या युतीचा फज्जा उडाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी इथेनॉल मिश्रित ई २० इंधनाला जोरदार विरोध केला. ते म्हणाले, जर तुम्हाला तुमचे वाहन ई २० पासून वाचवायचे असेल, तर गोवा निवडणुकीत भाजपला सत्तेतून बाहेर करा. भाजप हटाव गाडी बचाव हे धोरण ठेवा. भाजपला मतदान करू नका. कारण भाजप सरकारने लोकांना विश्वासात न घेता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून २०१९ पासून ते वितरण सुरू केले आहे. त्यामुळे लाखो वाहने खराब झाल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.

स्थानिक आप नेत्यांची गोची

येत्या निवडणुकीत काँग्रेस व आप यांच्यात युती न होता पंजाबप्रमाणे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतील, हे नक्की झाले आहे. पत्रकार परिषदेला आपचे गोवा संयोजक वाल्मिकी नाईक, आमदार वेन्झी व्हिएगस व क्रुझ सिल्वा, तसेच गोवा प्रभारी व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी मार्लिनो व इतर नेते उपस्थित होते. स्थानिक आप नेत्यांचे मत काँग्रेस सोबत युती करण्याचे आहे. मात्र, आपच्या प्रमुखांनीच काँग्रेसला मते देऊ नका, असे थेट सांगितल्यामुळे स्थानिक आप नेत्यांची गोची झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news