गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांची कार बुधवारी झुआरी पुलाच्या कठड्याला आदळली होती.  Pudhari photo
गोवा

Goa News | गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर थोडक्यात बचावले

कार झुआरी पुलाच्या कठड्याला आदळली

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोवा (Goa) विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. बुधवारी (दि. १७) सकाळी पर्वरी येथील विधानसभेत येत असताना सभापती रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांची कार झुआरी पुलावर अचानक लॉक झाली आणि पुलाच्या कठड्याला आदळली. सीट बेल्ट लावलेले असल्यामुळे एअर बॅग्ज उघडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातातून रमेश तवडकर थोडक्यात बचावले.

कार लॉक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. या कारमध्ये सभापती तवडकर यांच्यासह अन्य पाचजण होते. या अपघातात आम्हा कोणालाही दुखापत झाली नाही, आम्ही सर्व सुखरूप असल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT