Landslide : अनमोड घाटात दरड कोसळली; मोले-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प

दहा दिवसांपासून गोव्यात मुसळधार
Anmod Ghat landslide
अनमोड घाटात कोसळलेली दरड file photo
अनिल पाटील

पणजी : गोव्याहून बेळगावला जाणाऱ्या अनमोड घाटात आज गुरुवारी सकाळी दरड कोसळली असून मोले ते बेळगाव राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस ठप्प झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून गोव्यात मुसळधार पाऊस पडत असून याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पडझडीत झाला आहे. दरडी कोसळणे, रस्ता खचणे, घरांवर झाडे पडणे, रस्त्यांवर झाडे पडणे, अशा दुर्घटना वाढल्या आहेत.

Anmod Ghat landslide
म्हादई : कर्नाटक-गोवा संघर्षात ‘प्रवाह’

अनमोड घाटातील दुधसागर देवालयाच्या परीसरात आज सकाळी दरड कोसळली. या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन आणि बचाव कार्याची टीम पोहचली असून दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, जोगीवाडा - डिचोली येथे एका महिलेच्या घरावर झाड कोसळून घराचे नुकसान झाल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली आहे. या दुर्घटनेत आर्थिक नुकसान वगळता मातेसह मुलगा सुरक्षित असून घराची मोडतोड झाली आहे. मुलासह महिलेला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर आमरखणे-केरी, फोंडा येथे संरक्षक भिंत कोसळल्याने रस्ताही खचला आहे. मुसळधार पावसाने अर्धा रस्ता वाहून गेल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांसाठी धोका निर्माण झाला असून सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news