Shri Kanakadevi Temple Beautification Project pudhari photo
गोवा

Shri Kanakadevi Temple | काणकादेवी मंदिर परिसराचे होणार सुशोभीकरण

मंत्री सुभाष फळदेसाई; मंदिर परिसराची केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : सांगेच्या साळजीणी गावातील पवित्र श्री काणकादेवी मंदिराला अलीकडेच समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी भेट देऊन दर्शन घेतले तसेच मंदिर परिसराची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान मंदिराची सध्याची जीर्ण अवस्था पाहून त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करताना मंदिराच्या सुशोभीकरणासाठी वैयक्तिक स्वरूपात योगदान देण्याचा निर्णय घेतला. मंदिर परिसरात गंजलेली लोखंडी रचना, तसेच सिमेंटचे ढासळलेले भाग स्पष्टपणे दिसून येत असून, तातडीने दुरुस्तीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर मंत्री फळदेसाई यांनी मंदिराच्या पुनर्बाधणी व सुशोभीकरणासाठी वैयक्तिक स्वरूपात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

तसेच स्थानिक नागरिक व भाविकांच्या सहकार्याने सामूहिक पद्धतीने मंदिराचा विकास करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 'या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि वैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भाविकांसाठी स्वच्छ, सुस्थितीत आणि शांततामय वातावरण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे,' असे त्यांनी सांगितले.

लवकरच कामाला प्रारंभ

मंदिराच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. साळजीणी-नेत्रावळी येथे समुदाय सभागृह व रंगमंच उभारणीच्या कामाचा शुभारंभसमाजकल्याण मंत्री फळदेसाई यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT