Police Drug Raid | 7.90 लाखांचा ड्रग्ज शिवोलीत जप्त Pudhari Photo
गोवा

Police Drug Raid | 7.90 लाखांचा ड्रग्ज शिवोलीत जप्त

पुढारी वृत्तसेवा

हणजूण: हणजूण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत एका महाराष्ट्राच्या तरुणास अटक करून सुमारे सात लाख 90 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई दि. 4 रोजी पहाटे शिवोली येथील फुटबॉल मैदानाजवळ करण्यात आली.

शिवोली येथील फुटबॉल मैदानाजवळ अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह त्या ठिकाणी सापळा रचला.

पहाटे सुमारे एक च्या सुमारास 035903 या क्रमांकाची लाल रंगाची बलेनो कार त्या ठिकाणी येऊन थांबली पोलिसांनी संशयावरून गाडी अडवून झडती घेतली असता गाडी साहिल मनोहर कोरगावकर (25, रा. कोरगाव, पेडणे मूळ. रत्नागिरी, महाराष्ट्र)

या संशयिताकडे अंदाजे 06.52 ग्रॅम वजनाचे 316 एलएसडी या अमली पदार्थाचे पेपर्स ब्लॉट्स अंदाजे 7 लाख 90 हजार रुपये किमतीचे सापडले. पोलिसांनी पंचनामा करून अमलीपदार्थ जप्त केला व साहिल कोरगावकर यांच्या विरोधात अमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT