गोवा

गोवा : सांगेतील केंद्राजवळ गोंधळ, पोलीस आणि कवळेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

अनुराधा कोरवी

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. सांगेचे नगरसेवक संगमेश्वर नाईक यांनी मतदान केंद्राजवळ गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना तेथून हुसकावून लावले. संगमेश्वर नाईक हे अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांचे समर्थक आहेत.

संगमेश्वर नाईक आणि नगरसेवक मेश्यू डिकॉस्ता हे दोघेही जण सांगेतील सरकारी प्राथमिक शाळेच्या मतदार केंद्राजवळ थांबून मतदारांना आपल्याच बाजूने मतदान करण्यास सांगत होते. यावेळी संगमेश्वर नाईक आणि मेश्यू डिकॉस्ता यांच्या कार्यकर्त्यामध्ये गोंधळ पसरला.

ही घटना पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी मतदान केद्रांवर शांतता पसरण्यासाठी तेथून सगळ्याना हुसकावून लावले. पोलिस निरीक्षक हिरू कवळेकर यांनी पोलीसांचे पथक मागवून संगमेश्वर नाईक यांच्यासह त्यांच्या इतर समर्थकांना तेथून हाकलून लावले. पोलीस आणि कवळेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT