Pune Government Land Pudhari
गोवा

Sanquelim Land Conversion | साखळीतील ८० हजार चौ. मी. जमिनीचे रुपांतरण रद्द! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मोठा निर्णय

Sanquelim Land Conversion | मुख्यमंत्र्यांची माहिती; पेट्रोल, गॅस पुरेसे उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

साखळी मतदारसंघात कलम ३९ अ अंतर्गत होऊ घातलेले भू रुपांतरण रद्द करण्यात येणार आहे. नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांच्याशी मी याबाबत चर्चा केली असून यासंदर्भात त्यांना सूचना केली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यासंदर्भातील अधिसूचना बुधवारी रात्री काढण्यात आली.

पर्वरी येथे सचिवालयात बुधवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, साखळी मतदारसंघात सुमारे ८० हजार चौ. मी. जमिनीचा झोन ३९ अ कलमाअंतर्गत बदलण्याचा प्रस्ताव आहे.

या प्रस्तावाबाबत आपण मंत्री राणे यांच्याशी चर्चा करून जमीन रुपांतरण रद्द करण्याची सूचना केल्याचे ते म्हणाले. महसूल वाढवण्यासाठी सरकारने स्थावर मालमत्तेवरील स्टॅम्प ड्युटी १.५ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीच्या अध्यादेशाला मान्यता दिली आहे.

व्यावसायिक सिलिंडर पुरवठा वाढवला...

सरकार व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबतच्या चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा २० टक्के पुरवठा आधीच सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी २६ पासून हा कोटा ४० टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

पोटनिवडणुकीनंतर मंत्रिपद भरणार

फोंडा पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळात रिक्त असलेले मंत्रिपद भरण्यात येणार आहे. भाजप फोंडा पोटनिवडणूक १०० टक्के जिंकेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT