Porvorim Fake Currency Case File photo
गोवा

Porvorim Fake Currency Case | पर्वरीतील एचडीएफसी बँकेत बनावट नोटा जमा करणारा जेरबंद

Porvorim Fake Currency Case | येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत पाचशे रुपयांच्या बनावट बनावट नोटा जमा केल्याचा प्रकार घडला होता.

पुढारी वृत्तसेवा

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा

येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत पाचशे रुपयांच्या बनावट बनावट नोटा जमा केल्याचा प्रकार घडला होता. पर्वरी पोलिसांनी संशयिताला यलावर कर्नाटक येथे ताब्यात घेतले आहे. निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे येथील एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये दि. ५ रोजी संशयित आरोपी मैबुबा यालागी (४६, यलावर कर्नाटक) याने पाचशे रुपयांच्या समान क्रमांक असलेल्या सुमारे २३ हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जमा केल्या होत्या.

बँकेचे व्यवस्थापक विकास जॅरियल यांनी नोटांची तपासणी केली असता त्या बनावट निघाल्या. व्यवस्थापकांनी जमा केलेल्या नोटा मैबुबा यालागी याने आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. तत्संबंधीची तक्रार व्यवस्थापक जॅरियल यांनी दि. २० रोजी पर्वरी पोलिस स्थानकात नोंदवली.

पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी उत्तर गोवा अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक यलावर कर्नाटक येथे पाठवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी मैबुबा यालागी यास अटक करून पर्वरी पोलीस स्थानकात आणले.

आरोपीला म्हापसा येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पोलिसांनी भा. न्या. सं. २०२३ कायद्यांतर्गत १७८, १७९ कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. या तपासकामात उपनिरीक्षक सचिन शिरोडकर, कॉन्स्टेबल भिकाजी परब, नितेश गावडे आणि जयेश गडेकर यांनी भाग घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT