Panaji Municipal Corporation Reservation 
गोवा

Panjim Municipal Election 2026 | पणजी महापालिकेचा आखाडा तापला! शुक्रवारी बाबुश मोन्सेरात यांचे पॅनेल भरणार उमेदवारी अर्ज

Panjim Municipal Election 2026 | . पणजी महापालिकेत सत्ता कोणाची? जुन्या जाणत्या नगरसेवकांनी बाबुश यांच्याविरोधात थोपटले दंड

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

महापालिका पणजी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. मात्र दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज तिसवाडीच्या उपजिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकाऱ्यांसमोर दाखल झालेला नाही.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवस बाकी आहेत. अनेक इच्छुक उमेदवार मंत्री मोन्सेरात यांचे पॅनेल केव्हा जाहीर होते याकडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, भाजपचा पाठिंबा असलेले मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या पॅनेलमधील उमेदवारांकडून येत्या शुक्रवारी (२० फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर, नगरसेव सुरेंद्र फुर्तादो व माजी नगरसेवक दत्तप्रसाद नाईक यांनी एकत्रित येऊन आम्ही पणजीकर पॅनेल करत ही निवडणूक लढवत आहेत. काही प्रभागांमध्ये ते अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आतापासूनच दिसून येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT