Porvorim Cannabis Cultivation | पर्वरीत खळबळ! उच्चभ्रू वस्तीतील घरातच केली होती गांजाची लागवड; एएनसीचा मध्यरात्री छापा

Porvorim Cannabis Cultivation | एएनसीची कारवाई; गुन्ह्यामध्ये टोळी गुंतल्याचा संशय
Porvorim Cannabis Cultivation
Porvorim Cannabis CultivationPudhari file photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अमली पदार्थांविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने (एएनसी) आल्त पर्वरी येथील एका निवासी संकुलात बेकायदेशीर घरगुती गांजाची लागवड केल्याप्रकरणी घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Porvorim Cannabis Cultivation
Goa Noise Pollution| गोव्याच्या किनारपट्टीवर 'शांतता' येणार! ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या 750 आस्थापनांवर मोठी कारवाई

ही कारवाई काल मध्यरात्री करून १ लाख २९ हजारांचा अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांचा शोध घेण्यासाठी घरमालकाचे नाव गुपित ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नेर्लोन अल्बकर्क यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई त्यांच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. या कारवाईवेळी निवासी संकुलात पॉलिथिन पिशव्यांमध्ये लावलेली पाच गांजाची रोपे, १६ ग्रॅम संशयास्पद गांजा, २२ ग्रॅम उच्च क्षमतेचा हायड्रोपोनिक गांजा (वीड) सापडली तसेच तीन गांजाच्या बिया जप्त करण्यात आल्या आहेत.

Porvorim Cannabis Cultivation
Goa Cashew Production | गोव्याच्या काजूला चव छान, पण उत्पादकता कमी; राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्य मागे

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत सुमारे १ लाख २८ हजार ६०० रुपये आहे. याप्रकरणी अमलीपदार्थविषयक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात संबंधित ठिकाणी जाणूनबुजून लागवड व साठवण केल्याचे संकेत मिळाले आहेत.

यामध्ये काहीजण गुंतले असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अटक केलेल्या संशयिताचे नावे जाहीर करण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विकेश हडफडकर करत असून, निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क व अधीक्षक सुनीता सावंत यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news