गोवा

पणजी : स्मार्ट सिटीचे काम करताना रायबंदर येथे कामगार चिरडून मृत्यू

निलेश पोतदार

पणजी : पुढारी वृत्तसेवा रायबंदर येथे पणजी स्मार्ट सिटीचे काम करत असताना एक कामगार खोदलेल्या रस्त्यामध्ये अडकून पडला. येथे श्वास गुदमरून त्‍याचा मृत्‍यू झाला.

पणजी महापालिका क्षेत्रातील रायबंदर येथे श्री विठ्ठल मंदिर ते जुने गोवा वैद्यकीय महाविद्यालय या दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता स्मार्ट रायबंदर रस्ता करण्यासाठी स्मार्ट सिटी ने घेतलेला आहे. हा रस्ता स्मार्ट करतानाच रस्त्याच्या खालून सांडपाणी वाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी हा रस्ता खोदण्यात आलेला आहे. एके ठिकाणी हा रस्ता खोदण्यात आला होता. त्यातील माती काढण्यासाठी कामगार खड्यामध्ये उतरला असता, खोदलेल्या रस्त्याच्या फटीमध्ये तो अडकला व तो चिरडला गेला.

त्यानंतर अग्निशामक दलाला बोलावून त्याला बाहेर काढण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे उपचारासाठी त्‍याला पाठवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यापूर्वी पणजीमध्येही अशाच घटना घडल्या होत्या, मात्र कामगार मृत्‍यू होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT