Arrested Pudhari
गोवा

Goa Crime News | विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार; वास्कोच्या नराधमाला 10 वर्षांची सक्तमजुरी, पणजी न्यायालयाचा निकाल

Goa Crime News | एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण व बलात्कारप्रकरणी काटे बायणा येथील संशयित तौफिक कोतूर याला पणजीतील जलदगती न्यायालयाने (पोक्सो) त्याला दोषी ठरवत १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण व बलात्कारप्रकरणी काटे बायणा येथील संशयित तौफिक कोतूर याला पणजीतील जलदगती न्यायालयाने (पोक्सो) त्याला दोषी ठरवत १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे.

न्यायालयाने आरोपी कोतूर याला शिक्षा ठोठवताना ५० हजार रुपयांचा दंड व तो भरल्यास पीडितेला ती भरपाई म्हणून द्यावी अन्यथा तो न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांची साधी कैद भोगावी लागेल, असे स्पष्ट केले आहे. त्याने खटल्यावरील सुनावणीवेळी कोठडीत काढलेला कालावधी या शिक्षेतून कमी करण्यात यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ही घटना २०१५ साली घडली होती व त्याची तक्रार वास्को पोलिसांत दाखल झाली होती. तत्कालिन उपअधीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्योती देसाई यांनी तपास केला होता. तिने ठोस पुरावे जमा करत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

आरोपी कोतूर याने वास्को परिसरातच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी ओळख करून मैत्री केली. त्याने तिला विवाह करण्याचे वचन देऊन तो तिच्यावर वारंवार लैगिक अत्याचार करत होता. तिला त्याने गर्भपात करण्यासही जबरदस्ती केली होती. त्यानंतर आरोपीने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला.

त्यामुळे या मुलीने बलात्काराची तक्रार आरोपीविरुद्ध दाखल केली होती. या बलात्कारप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र, पीडित मुलीने दिलेल्या साक्षीत तिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याचे तसेच आरोपीकडून कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा क्रूरता झाल्याचा आरोप केलेला नाही.

हे लैंगिक संबंध विवाहाच्या वचनावर आधारित होते. त्यामुळे या गुन्ह्यासाठी कायद्याने विहित केलेली कमाल शिक्षा ठोठावण्याचे कोणतेही कारण आढळत नाही. हा बलात्काराचा गुन्हा असल्याचे विचारत घेता कलम ३७६ खाली १० वर्षाची सक्तमजुरी देणे योग्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT