Panaji shopkeepers fire safety demand 
गोवा

Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची दुकानदारांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Panaji Market 109 Shops Fire Hazard Safety Demand

पणजी : वास्को येथील मार्केटमधील १५० च्या आसपास दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर पणजीसह राज्यातील इतर मार्केटमधील दुकानदारांना आगीची भीती सतावत आहे. पणजी मार्केटमधील १०९ दुकानदारांना आगीचा धोका आहे. त्यांनी येथे त्वरित अग्निसुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पणजी मार्केटमध्ये एका बाजूला इमारतीत दुकाने आहेत आणि दुसऱ्या बाजूला जुन्या मार्केटमध्ये १०९ दुकानेही लहान-लहान शेडमध्ये आहेत. या जुन्या मार्केटमध्ये असलेली दुकाने दाटीवाटीने आहेत. दोन माणसे सोबत एकाचवेळी जाऊ शकत नाहीत. अशा या अडचणीच्या मार्केटमध्ये जर एखादी आगीची दुर्घटना घडली किंवा एखाद्या दुकानाला आग लागली तर सर्वच्या सर्व १०९ दुकाने जळून खाक होतील, अशी भीती दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

या दुकानांच्या छप्परावर साधे पत्रे आहेत, ते अनेकवेळा तुटतात, वारंवार दुरुस्त करावे लागतात. जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत अशा प्रकारचे जुन्या पद्धतीचे मार्केट असणे ही गोव्याला शोभणारी गोष्ट नसल्याचे एका दुकानदाराने सांगितले.

पाहणी करून उपकरणे उपलब्ध करा

पणजीच्या या मार्केटमधील दुकानदाराने सांगितले की, येथील अग्निसुरक्षेची उपकरणे मोडकळीस आलेली आहेत, पाणी पुरवण्यासाठी असलेले रबराचे पाईप फाटले आहेत. त्यांना फिरवणारे चक्र गंजले आहे. जर आतील भागांमध्ये आग लागली तर तेथे पाण्याचे पाईप नेणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी अग्निशामक दलाचे अधिकारी आणि सरकारी अधिकारी यांनी सुंक्तपणे या मार्केटचे पाहणी करून योग्य ती अग्निसुरक्षा उपकरणे उपलब्ध करावीत, अशी मागणी दुकानदारांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT