Gao Manoj Parab return to RGP| मनोज परब यांची 'आरजी'मध्ये घरवापसी

पुन्हा सक्रिय होणार असल्याचा खोलकर यांचा दावा; पक्षांतर्गत वाद पेटला
मनोज परब
मनोज परब
Published on: 
Updated on: 

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे (आरजीपी) माजी अध्यक्ष मनोज परब हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असून त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे, अशी महत्त्वाची माहिती आरजीचे माजी खजिनदार अजय खोलकर यांनी दिली आहे.

मनोज परब
Goa Market Association Shutdown|नुकसानग्रस्तांना पाठिंब्यासाठी बाजार संघटनेकडून दुकाने बंद

मनोज परब यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देताना सक्रिय राजकारणातून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याविषयी स्पष्टीकरण देताना खोलकर म्हणाले, "पक्षाच्या संस्थापक सदस्यांची परब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांना पक्षाची ध्येयधोरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत व पक्षाची एकता टिकवण्यासाठी त्यांनी त्यावेळी दूर होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांना पुन्हा पक्षात परतण्याचे आवाहन केले जात आहे. चार-पाच दिवसांत याबाबतची दिशा स्पष्ट होईल.

'फुटबॉल' चिन्हावरच लढणार !

पक्षाच्या अधिकृततेवर आणि चिन्हावर दावा करताना खोलकर म्हणाले, "आरजीपीची सर्व अधिकृत कागदपत्रे आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक आम्ही 'फुटबॉल' या पक्षाच्या चिन्हावरच लढवणार आहोत. सध्या स्वतःला आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेणाऱ्यांना आम्ही आधीच पक्षातून काढून टाकले आहे. पक्षाच्या विद्यमान समितीत असणारे अनेक जण पक्षाचे साधे सदस्यही नाहीत. यासंदर्भातील आमची भूमिका पुढील आठवड्यात सविस्तर मांडली जाईल.

मनोज परब
Goa assembly elections| विधानसभा निवडणुकीत युगोडेपा, शिवसेनेची एन्ट्री

निवडणूक आयोग, प्रशासन आमच्या संपर्कात : खोलकर

"पक्षाची जुनीच समिती अधिकृत असून आम्ही आमचे सर्व दस्तावेज निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यामुळे निवडणूक आयुक्त किंवा जिल्हाधिकारी निवडणूकविषयक कामकाजासाठी थेट आमच्याशीच संपर्क साधतात आणि आमचाच प्रतिनिधी तेथे उपस्थित असतो. विरोधकांना असा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असा टोलाही खोलकर यांनी लगावला.

लवकरच बूथ समित्यांसह अन्य समित्यांची नवी रचना

विरोधाकांकडून कितीही आरोप झाले तरी पक्षकार्य थांबलेले नाही. लवकरच बूथ समित्यांसह अन्य समित्यांची नवी रचना जाहीर केली जाईल आणि आरजीपी पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, परब यांच्या पुनरागमानाच्या वृत्तामुळे आरजीपीतील मनोज परब समर्थकांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण गोव्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.