Goa Crime |अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार, क्राईम ब्रँच निरीक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार, क्राईम ब्रँच निरीक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

Goa Crime Branch Inspector Booked Under POCSO For Minor Assault

पणजी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देयकर यांच्याविरोधात जुने गोवे पोलिसांनी बलात्कार, पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईला एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

कथित लैंगिक अत्याचाराची घटना गुन्हे शाखेच्या आवारात घडल्याचा आरोप १७ वर्षीय तक्रारदार मुलीने केला आहे. पीडित मुलगी एका तक्रारीच्या संदर्भात गुन्हे शाखेमध्ये आली होती तेव्हा पोलिस निरीक्षक विकास देयकर यांनी या मुलीशी गैरवर्तन तसेच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.

हे प्रकरण अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने पोलिसांकडून तपास गोपनीय पद्धतीने होत आहे. तक्रारीच्या आधारे जुने गोवे पोलिसांनी संबंधित गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेची पार्श्वभूमी, कथित प्रकाराची परिस्थिती आणि त्यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची भूमिका याबाबत पोलिसांकडून माहिती गोळा केली जात आहे.

हे प्रकरण गुन्हे शाखेच्या आवारातच घडल्याचा आरोप करण्यात आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. जनतेचे सेवक असलेले पोलिस अधिकारी हे भक्षक बनल्याचा आरोप झाल्याने पोलिस खात्याची प्रतिमा डागाळली गेली आहे.

Crime News
Goa Market Association Shutdown|नुकसानग्रस्तांना पाठिंब्यासाठी बाजार संघटनेकडून दुकाने बंद

ज्या ठिकाणी ही मुलगी पोलिस निरीक्षकाला भेटली तेव्हा त्यावेळी उपस्थित असलेल्या इतर पोलिसांच्या जबान्या व चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती पोलिस सूत्राने दिली. दरम्यान, प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Crime News
Goa assembly elections| विधानसभा निवडणुकीत युगोडेपा, शिवसेनेची एन्ट्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.