Gas Pipeline Pudhari
गोवा

Panaji Gas Pipeline Safety | भूमिगत गॅस वाहिनीमुळे सुरक्षेचा प्रश्न

Panaji Gas Pipeline Safety | गोवा कॅनने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

उत्तर गोव्यातील भूमिगत नैसर्गिक वायू (गॅस) पाईपलाईनबाबत सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर मुद्दा पुढे आला असून, गोवा कन्झ्युमर अॅक्शन नेटवर्क (गोवा कॅन) ने याबाबत उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अंकित यादव यांना पत्र पाठवले.

या पत्रात गोवाकॅनने विशेषतः पणजीत भूमिगत गॅस पाईपलाईनबाबत योग्य व अद्ययावत सार्वजनिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे जीवित व मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

गोवाकॅनने नमूद केले आहे की, अशा धोकादायक व कालबाह्य माहितीचे फलक कसे लावले गेले याची चौकशी करण्यात यावी. तसेच, अग्निशमन, पोलिस, वीज विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका यांसारख्या प्रथम प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणांना याची पूर्वकल्पना नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

उत्तर गोवा व फोंडा येथील सर्व भूमिगत पाइपलाइनची सविस्तर माहिती सादर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. १४ ते २० एप्रिल हा कालावधी 'फायर प्रिव्हेन्शन वीक' म्हणून साजरा होत असल्याने, या काळातच जुने फलक तत्काळ बदलून नवीन हेल्पलाईन क्रमांकांसह सूचना फलक लावावेत, अशी मागणी करण्यात आली.

उपाययोजना कराव्यात

विशेष म्हणजे, त्या फलकावर दिलेला दूरध्वनी क्रमांक अस्तित्वात नसल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT