Omkar Elephant Pernem | 'ओंकार' हत्तीचा मोप-कडशी परिसरात धुमाकूळ! वनविभागाचे पथक हतबल, ग्रामस्थ दहशतीखाली

Omkar Elephant Pernem | शेतीचे नुकसान; स्थानिकांचा दावा, काळजी घेण्याचे आवाहन
Omkar Elephant Sindhudurg
Omkar Elephant SindhudurgAI Image
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

बंदोबस्त ओंकार हत्तीचा करण्यास अजूनही वन खात्याला यश आले नाही. सध्या ओंकार हत्तीने कडशी मोप या ठिकाणी ठाण मांडले असून शेतीची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. लोकवस्तीत घुसत असल्यामुळे लोक भयभीत झाले आहे. तर दुसऱ्या बाजूने मोपचे सरपंच सुबोध महाले यांनी नागरिकांनी एकटे रस्त्यावर येऊ नये. रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

Omkar Elephant Sindhudurg
Panaji Municipal Election Petition | पणजी महापालिका निवडणूक रद्द होणार? 'मतदानाची गुप्तता पाळली नाही' म्हणत उत्पल पर्रीकर न्यायालयात

मागील पाच दिवसांपासून ओंकार हत्तीने नेतर्डे मार्गे मोप कडशी परिसरात प्रवेश करून वन खात्याला जागृत करण्याचे काम केले. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवरून या ओंकाराचा बंदोबस्त करावा, यासाठी पाऊले उचललेली आहेत.

प्रशिक्षित माहुत अजून पोहोचत नसल्यामुळे आणि ओंकार जंगलात वास्तव्यास असून तो कुठे राहतो कुठे जातो? याचा सहज पत्ता लागत नसल्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रातील वन खात्याचे अधिकारी हा ओंकार पुन्हा आमच्या हद्दीत अर्थात महाराष्ट्रात येऊ नये यासाठी ओंकार हत्ती नक्की कुठे वास्तव्य करून आहे त्याची ड्रोनद्वारे पाहणी करण्याचे काम सध्या बेकायदेशीरपणे केली जात आहे.

Omkar Elephant Sindhudurg
Shirgao Lairai Jatra 2026| स्टॉल्सच्या परवानगीसाठी कडक नियमावली जाहीर

ड्रोनचा वापर करण्यास निर्बंध असताना देखील काही जण ड्रोनद्वारे चित्रीकरण करत आहे. हा परिसर विमाने उड्डाणे आणि उतरण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोप विमानतळावर असल्यामुळे या परिसरात कसल्याच प्रकारची ड्रोन चित्रीकरण करण्यास निर्बंध घातलेले आहेत.

मात्र महाराष्ट्रातील वनखात्याचे कर्मचारी ड्रोनद्वारे कसा काय ओंकाराचा शोध घेतात ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी वरिष्ठ वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडे चर्चा करून या ओंकाराचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी आणि सूचना अधिकाऱ्यासमोर केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news