ओंकार हत्तीला बनतारा न नेता नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
तिलारी जंगल हेच ओंकारचे नैसर्गिक अधिवास असल्याचा पर्यावरणप्रेमींचा युक्तिवाद आहे.
तिलारी हत्तीमुक्त करण्यामागे जमीन व्यवहार, खाणी व बिल्डर लॉबीचा आरोप करण्यात आला आहे.
हत्तींचे अस्तित्व टिकले तर पश्चिम घाटाची परिसंस्था सुरक्षित राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
पणजी : प्रभाकर धुरी
ओंकार हत्तीमुळे ‘नैसर्गिक अधिवास’ हा शब्द खूप चर्चेत आला. कोल्हापूर येथील सर्किट बेंचने ओंकारला बनतारा येथे न नेता, आवश्यक असल्यास उपचार करून पुन्हा महाराष्ट्रातील नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर मात्र या शब्दावरून अनेक मत-मतांतरे पुढे आली.
ओंकारला बनतारा येथे नेऊ नये म्हणून मुंडण आणि उपोषण करणाऱ्या ओंकारप्रेमींनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले, तर हत्तीमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी ओंकारसह सर्वच हत्ती बनतारा येथे न्यावेत, अशी भूमिका मांडली.
गोव्यात ओंकार आल्यावर शेतकरी आणि स्थानिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला तिलारीतील नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली. यानंतर तिलारी खोऱ्यातील अनेकांनी तिलारीचे जंगल म्हणजे नैसर्गिक अधिवास नव्हे, असा युक्तिवाद केला. त्यांच्या मते, ओंकारचा जन्म सह्याद्रीत म्हणजेच तिलारी खोऱ्यात झाला असल्याने ओंकार जन्माने सह्याद्रीचा किंवा तिलारीचा आहे, त्यामुळे त्याला तिलारीतच सोडावे, असे सुचविण्यात आले.
पश्चिम घाटाचा भाग असलेले तिलारीचे विस्तीर्ण जंगल घनदाट, सदाहरित आणि निम-सदाहरित आहे. येथे विविध प्रकारची दुर्मीळ झाडे आणि वनस्पती आढळतात. हत्ती, वाघ, ब्लॅक पँथर, बिबट्या, गवे, माकडे, कोल्हे, तरस, किंग कोब्रा, हरिण, सांबर यांसारखे प्राणी तसेच हसियाल, मोर यांच्यासह अनेक पक्ष्यांच्या प्रजाती या जंगलात आढळतात. या जंगलातून वाघ आणि हत्तींचे कॉरिडॉरही जातात.
तिलारीचे जंगल या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. उगाचच तिलारीची तुलना अॅमेझॉनशी केली जात नाही. असे असले तरी अनेकांनी ‘नैसर्गिक अधिवास’ हा शब्द विनाकारण कळीचा मुद्दा बनवला आहे. तिलारी हत्तीमुक्त करण्यामागे तिलारी धरण क्षेत्रातील मोक्याच्या जमिनी राजकारणी, धनदांडगे आणि सिनेसृष्टीतील अनेकांनी विकत घेतल्याचे वास्तव आहे.
त्यापैकी काहींनी आपल्या जमिनी परप्रांतीय बिल्डर लॉबीला विकल्या आहेत, काही विकायच्या तयारीत आहेत. काहींना क्रशर आणि खाणी चालवायच्या आहेत. या सर्वांमध्ये हत्ती अडसर ठरत आहेत. त्यामुळे त्यांना दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करायचा आहे.
मात्र, हत्ती वाचले तर अॅमेझॉन वाचेल, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.
जंगले पुन्हा उभी करायला हवीत !
गेल्या २२-२३ वर्षात्त माणसाने जंगले नाहीशी करून प्राणी, पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा केला. ऑक्टोबर २००२ मध्ये हत्ती तिलारीत आले, तेव्हाच्या जंगलापैकी ३० ते ४० टक्केच जंगल आता शिल्लक आहे. नैसर्गिक अधिवास हरवल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत येतात आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष सुरू होत्तो. तो टाळायचा असेल, तर जंगले पुन्हा उभी करायला हवीत, नुसता वन्य प्राण्यांना दोष देऊन चालणार नाही.
नुकसानीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होतोय
हत्ती, गये, माकड, मोर, शेकरू यांच्यामुळे शेतकऱ्यांची कष्टाने उभी केलेली शेती, बागायती नष्ट होत आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना अत्यल्प भरपाई मिळते, जी त्यांच्या उत्पन्नाच्या पाच दहा टक्केच असते. शेतकऱ्याला वाचवण्यासाठी सरकारने शंभर टके भरपाई द्यायला हवी. शेतकऱ्यांचा कळवळा खरोखर राजकारण्यांना असेल, तर त्यांनी हात्तीच नव्हे, तर गले, माकड, केलडी पण वनहारात न्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.