One Map Goa  
गोवा

One Map Goa | 'वन मॅप गोवा' पोर्टल ठरतेय मैलाचा दगड; जमिनीची अचूक माहिती आता एका क्लिकवर

One Map Goa | जीआयएस पोर्टलबाबत महामंडळाकडून फायदे जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (डीआयटीईएसी) महामंडळाच्या दूरदर्शी वन मॅप गोवा जीआयएस पोर्टल नागरिक, व्यवसयिक आणि नियोजकांसाठी लाभदायक ठरत आहे.

महामंडळाने प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकातून या मॅपचे फायदे जाहीर केले आहेत. पत्रकात म्हटले आहे की, गोव्यात अचूक जमीन किंवा पायाभूत सुविधांची माहिती मिळवणे म्हणजे कागदांचे गठ्ठ चाळणे, अनेक सरकारी कार्यालयांत फेऱ्या मारणे आणि जुन्या नकाशांवर अवलंबून राहणे असे होते.

एखादा रुग्ण नागरिक जवळचे रुग्णालय शोधत असेल, एखादा व्यावसायिक गुंतवणुकीसाठी योग्य जागा पाहत असेल किंवा एखादा नियोजक भविष्यातील पायाभूत सुविधा आखत असेल, तर ही प्रक्रिया संथ आणि विस्कळीत होती.

मात्र २०२४ मध्ये ही परिस्थिती बदलली. वन मॅप गोवाच्या सुरुवातीपासून राज्याने भौगोलिक माहिती (स्पेशल डेटा) सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले.

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स महामंडळ आणि गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीईएल) यांच्या सहकार्यान विकसित केलेले वन मॅप गोवा जीआयएस पोर्टल, गोव्याची सर्व भौगोलिक माहिती एका सोप्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT