Goa Drug Case | वार्का ड्रग्ज प्रकरणी अमेरिकन संशयित सुसान अपोलोला जिल्हा न्यायालयाकडून सशर्त जामीन

Goa Drug Case | वार्का येथे २६ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत कोलवा पोलिसांनी आकाश सजिथ व प्रतीक बर्मन या संशयितांकडून चरस व एमडीएमए जप्त केले होते.
Karad Court Judgment |
Karad Court Judgment | कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड (File Photo)
Published on
Updated on

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा

वार्का येथे २६ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत कोलवा पोलिसांनी आकाश सजिथ व प्रतीक बर्मन या संशयितांकडून चरस व एमडीएमए जप्त केले होते. याप्रकरणी ड्रग्ज पुरवठादार म्हणून अटक केलेल्या सुसान अपोलो (६७) हिला दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Karad Court Judgment |
Goa Drug Case | कुडचडेत नऊ लाखांचा गांजा जप्त; अमली पदार्थ तस्करीचे 'केपे कनेक्शन' उघड

कोलवा पोलिसांनी वार्का येथील एका फ्लॅटवर २६ जानेवारी रोजी छापा टाकला होता. या कारवाईत सुरुवातीला आकाश सजिथ आणि प्रतीक बर्मन या दोन युवकांना चरस व एमडीएमए या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून अमेरिकन रहिवासी असलेल्या सुसान अपोलो हिचे नाव पुढे आले. तिने अमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा आरोप होता. दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी पोलिसांकडे संशयिताची पुरेशी कोठडी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news