Goa Omkar Elephant  (Pudhari File Photo)
गोवा

Goa Omkar Elephant | ओंकार हत्तीवरून गोवा-महाराष्ट्र सीमेवर 'हायव्होल्टेज' ड्रामा! वन कर्मचाऱ्यांच्या घुसखोरीवरून ग्रामस्थ संतापले

Goa Omkar Elephant | गोवा वनविभाग हत्तीला सिंधुदुर्गात पाठवण्यासाठी सक्रिय

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सासोली येथून हत्ती गोव्यात येणार याची बातमी सर्वप्रथम पुढारीने दिली होती. त्या वृत्तानुसार ओंकार हत्ती हणखणे, गोव्यात शनिवार, दि. २१ रोजी रात्री पोहोचला. मात्र, त्याला गोवा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा महाराष्ट्र हद्दीत पाठवले. त्यानंतर तो कालपासून कळणे सडा, फोंडये परिसरात आहे.

आज, सोमवारी रात्री १०.१८ मिनिटांनी तो फोंडये रस्त्यालगत गोवा सीमेवर असल्याचे दिसले. दरम्यान, ओंकारला गोव्यातून महाराष्ट्रात पाठविण्यासाठी गोवा वनविभागाचे कर्मचारी गोवा महाराष्ट्र सीमेवरील सिंधुदुर्ग हद्दीत घुसले होते.

महाराष्ट्रातील काहीचे ओंकारला पुन्हा सिंधुदुर्गात पाठवण्याचे मत होते. यावरून वादही झाला. काहींनी गोवा वन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र हद्दीत घुसून ओंकारला परतवून लावण्याच्या कृतीचा विरोध केला. या वादावादीत एक पोलिस अधिकारी ग्रामस्थांच्या रोषाला कारण ठरला.

अखेर ग्रामस्थांनी तक्रार केल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावून तंबी दिल्यावर प्रकरण शांत झाले. ओंकार भेडले माडाच्या पानांसाठी वन कर्मचाऱ्यांच्या मागून निमूटपणे जातो, हे गोवा, महाराष्ट्रातील लोकांनी पाहिले आहे. तोच फंडा ओंकारला गोव्यात येण्यापासून रोखण्यासाठी गोवा वन कर्मचाऱ्यांनी वापरला.

त्यांनी ओंकारला परतण्यासाठी गुळाचा वापर केला. मात्र याला लोकांनी आक्षेप घेतला. ओंकार बराच काळ कळपात राहिल्याने तो रानटी हत्तीप्रमाणे हल्ला करू शकतो अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, गोवा वन कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत माहिती घेण्यासाठी वनक्षेत्रपाल हरीश महाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT