Soham Naik POCSO Case | नराधम सोहम नाईकची विकृती कायम! अटकेत असतानाही अश्लील हावभाव; संतापलेल्या जमावाने पोलीस ठाण्यातच चोपला

Soham Naik POCSO Case | कुडचडे सेक्स स्कँडल : लोकांकडे पाहून केले अश्लील हावभाव
goa news
goa news
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सोहम सुशांत नाईक या वीस वर्षीय युवकाने पोलिसांच्या ताब्यात असतानाही आपली विकृत मानसिकता पुन्हा दाखवली.

goa news
Goa Sex Scandal| नराधम सोहम नाईकला बेड्या! 16 अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या नगरसेवक पुत्राला अटक

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांकडे पाहत आरोपीने अश्लील हावभाव केल्यामुळे संतापलेल्या जमावाने पोलिस स्थानकात प्रवेश करत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सोहम सुशांत नाईक याला ओढून बाहेर काढत यथेच्छ चोप दिला.

आपण केलेल्या कृत्याबद्दल त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा कोणताही लवलेश नव्हता. नगरसेवक असलेले आपले वडील दरवेळी प्रमाणे याही वेळी आपल्याला या प्रकरणातून बाहेर काढतील, अशी गैरसमजूत झालेल्या सोहमला त्याच्या कृत्यांमुळेच आज कोठडीची हवा खावी लागली आहे.

अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केल्याच्या गंभीर आरोपांमुळे सोहम नाईक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलिस उपाधीक्षक आशीष शिरोडकर यांनी पीडित मुलींनी पुढे येणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

ठोस पुरावे उभे करण्यासाठी आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी पीडितांचे जवाब महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (१) व २९४ (२) (अ) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ५७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणात अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने पोक्सो कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी पुरावे समोर आल्यानंतर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोहमचे अनेक कारनामे आता उघड होत आहेत.

त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी एक एक करून अल्पवयीन मुली समोर येत आहेत. काही प्रकरणे चार वर्षांपूर्वीची असून आपल्या पालकांना कळू न देता त्यांनी पोलिस तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

पुढारीच्या समाजहितैषी पत्रकारितेचे कौतुक

तब्बल १६ अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या संतापजनक प्रकरणाचा भांडाफोड करताना दै. 'पुढारी'ने दाखवलेली तत्परता, निर्भीड भूमिका आणि निर्भय वृत्तांकन यामुळेच अखेर संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या धाडसी पत्रकारितेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दै. 'पुढारी'च्या कार्याचे कौतुक करताना कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी अशा संवेदनशील प्रकरणात सत्य बाहेर आणण्यासाठी धाडस लागते, दै. 'पुढारी'ने दाखवलेली निर्भीड भूमिका ही समाजासाठी आदर्श आहे. संशयितांना शिक्षा होण्यासाठी हे वृत्तांकन महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. दै. 'पुढारी'च्या निर्भीड पत्रकारितेमुळेच या प्रकरणाला वाचा फुटली असून, समाजातील विकृत प्रवृत्तींविरोधात लढा देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.

goa news
Drugs Seized Goa | झटपट श्रीमंत होण्याच्या नादात गोव्याची तरुण पिढी 'ड्रग्ज'च्या विळख्यात! पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

सोहम विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा

कुडचडे-काकोडा परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या कथित सेक्स रॅकेट प्रकरणातील संशयित नगरसेवकपुत्र सोहम सुशांत नाईक याच्याविरुद्ध पोलिसांनी पोक्सो आणि गोवा बाल कायद्यांतर्गत कठोर कलमे लागू केली आहेत. स्थानिक, लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी दिलेल्या तीव्र इशाऱ्यानंतर आणि पोलिस स्थानकावर घातलेल्या घेरावानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news