गोवा खंडपीठाची इमारत बॉम्बने उडवण्याची धमकी Pudhari Photo
गोवा

Bomb Threat : उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

पोलिस आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल

पुढारी वृत्तसेवा

North Goa Collector's office threatened with bomb blast

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्याची राजधानी पणजी स्थित उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला अज्ञात ईमेलद्वारे आयईडी (स्फोटक उपकरण) वापरून उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच पणजी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, बॉम्ब शोध व निकामी करणारे पथक सुद्धा सतर्कतेने तपास करत आहे.

राज्यात एकीकडे भारत-पाकिस्तान युद्धामुळे स्थिती गंभीर बनत असताना उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय स्फोटकाच्या सहाय्याने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आला आहे. सुरक्षा दलांनी परिसरात घेराव घातला असून सर्व कर्मचाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या इमारतीची संपूर्ण तपासणी सुरू असून, कोणताही धोका नोंदवलेला नाही, मात्र प्रशासन अधिकृत माहितीची प्रतीक्षा करत आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जम्‍मू काश्मीर येथील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्‍या भारतीयांवर गोळ्या झाडल्‍या होत्‍या. यामध्ये २६ निष्‍पाप भारतीयांचा बळी गेला होता. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर भारत सरकाने या हल्‍ल्‍याची गंभीर दखल घेत पाकिस्‍तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्‍ले करत ते उद्धवस्‍त केले होते.

दरम्‍यान पाकिस्‍तानकडून होणाऱ्या संभाव्य हल्‍ल्‍यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. मात्र देशभरात अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अनेक शहरांमध्ये मॉकड्रिल केले जात आहे. त्‍यातच गोव्याची राजधानी पणजी स्थित उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला उडविण्याचा अज्ञात ईमेलद्वारे धमकी आल्‍याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT